WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम

May 11, 2024 08:41 AM IST

WhatsApp Profile : व्हॉट्सॲपने प्रोफाइल फोटो संदर्भात मोठी अपडेट आणले आहे. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना आता त्यांच्या फ्रेंडलिस्ट मधील प्रोफाइल फोटोंचे स्क्रीनशॉट घेणे शक्य होणार नाही. ही सुविधा बंद करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपने प्रोफाइल फोटो संदर्भात मोठी अपडेट कंपनीने आणले आहे.
व्हॉट्सॲपने प्रोफाइल फोटो संदर्भात मोठी अपडेट कंपनीने आणले आहे.

WhatsApp Profile : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर आणत आहेत. या नव्या फीचरमुळे चॅटिंगचा अनुभव मजेदार ठेवण्याचा व्हॉट्सॲपचा प्रयत्न आहे. या नव्या वैशिष्ट्यांसह, व्हॉट्सॲप आपल्या लाखो वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट देखील आणत आहे. याचाच एक भाग म्हणून बहुप्रतीक्षित असलेले नवे अपडेट व्हॉट्सॲपने जारी केले आहे.

या नव्या फीचरची युजर्स देखील खूप दिवसांपासून वाट पाहत होते. व्हॉट्सॲपशी संबंधित अपडेट्स ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo नुसार, कंपनी लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी WhatsApp प्रोफाइल फोटोंचे स्क्रीनशॉट ब्लॉक करणार आहे. अनेक देशात हे अपडेट लागू झाले आहे. त्यामुळे आता कुणालाही कुणाच्याही प्रोफाइल फोटोचा स्क्रीन शॉट अथवा फोटो कॉपी आणि सेव्ह करता येणार नाही.

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

व्हॉट्सॲपने जारी केले नवे अपडेट

प्रोफाईल फोटोंचे स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यासाठी कंपनीने फीचर विकसित केले आहे. या पूर्वी Android साठी WhatsApp बीटा फीचर आणले गेले आहे. हे नवे फीचर iOS साठी WhatsApp Beta साठी उपलब्ध करून दिले जात आहे. WABetaInfo ने टेस्टफ्लाइट ॲपमध्ये iOS २४.१०.१०.७० साठी WhatsApp बीटामध्ये हे नवे बदल आणले आहेत. कंपनीने या बाबत एक्सवर पोस्ट केली असून या माध्यमातून या नवीन फीचरची माहिती देताना WABetaInfo ने त्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

Elon Musk : अमेरिकन नागरिकांची भूमिका आलेली २०२४ची शेवटची निवडणूक! एलोन मस्क का म्हणाले असे ? वाचा

शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये व्हॉट्सॲपने स्क्रीन कॅप्चर ब्लॉक केल्याचं दिसत आहे. फीचर रोल आउट केल्यानंतर यूजर्स कोणाच्याही प्रोफाईल फोटोचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. हे फीचर फोनमध्ये दिलेल्या स्क्रीन रेकॉर्डिंग पर्यायासाठी देखील राहणार आहे. सध्या या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. युजर्सच्या प्रोफाईल फोटोंचा गैरवापर रोखण्यातही हे फीचर मदत करेल, असे कंपनीने म्हटले आहे.

या फीचरमध्ये दिसून येणारा एक दोष म्हणजे प्रोफाईल फोटो दुसऱ्या डिव्हाईसच्या कॅमेऱ्यातून कॅप्चर करता येणार आहे. अशा स्थितीत हे फिचर आणण्याचा कंपनीचा उद्देश पूर्ण होईल की नाही हे निश्चितपणे सांगणे कठीण होणार आहे. हे फिचर अद्याप विकसनशील आणि बीटा चाचणी टप्प्यात असून बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर, कंपनी या फीचरचे नवे अपडेट प्ले स्टोअरवर आणणार आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर