सरकार देणार मोफत मोबाइल रिचार्ज : सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर अनेक ठिकाणी एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात मोफत रिचार्ज देण्याचा दावा करण्यात आला आहे. मेसेजमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान फ्री रिचार्ज स्कीम अंतर्गत सरकार तुम्हाला कोणतेही पैसे न देता ३ महिने मोबाईल चालवण्याची संधी देत आहे. जर तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर तुमच्यासाठी आज ही बातमी वाचणे खूप गरजेचे आहे.
पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'सरकारच्या नावाने व्हायरल होणारा हा मेसेज पूर्णपणे फेक मेसेज आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. या मेसेजसोबत दिलेली लिंक फिशिंगशी संबंधित आहे. या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही एका फेक वेबसाईटवर पोहोचाल जिथे तुमचे डिटेल्स घेऊन तुम्हाला फसवणुकीचे शिकार केले जाईल.
जर तुम्हाला फेकबद्दल तक्रार करायची असेल तर व्हॉट्सअॅपच्या मदतीने +91879971159 मेसेज करून तक्रार करू शकता. याशिवाय factcheck@pib.gov.in नंबरवरही तुम्ही तक्रार करू शकता.
फेक मेसेज ओळखणे गरजेचे आहे. जर तुम्ही कोणत्याही मेसेजमध्ये पैसे किंवा भेटवस्तूंचे आमिष दाखवत असाल तर समजून घ्या की तो फेक मेसेज आहे. फेक मेसेजमध्ये तुम्हाला एक लिंक देण्यात आली आहे, ज्यावर क्लिक केल्यास अकाऊंटमधून पैसे चोरले जाऊ शकतात. संदेशाच्या भाषेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या कंपनीकडून मेसेज आला तर त्यात भाषेची चूक नसते.
तसेच, नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, नागरिक त्यांच्याशी झालेल्या फसवणुकीची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करू शकतात, असेही सांगण्यात आले आहे. सरकारने याआधी १५५२६० हा क्रमांक जारी केला होता, तो बदलण्यात आला आहे. तुमच्यासोबत घडलेल्या कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याबाबत तुम्ही येथे तक्रार नोंदवू शकता.
संबंधित बातम्या