WhatsApp Camera Effects: व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक जबरदस्त फीचर आणले आहे. हे फीचर कॅमेऱ्याशी संबंधित आहे. डब्ल्यूएबेटाइन्फोने एक्स पोस्टमध्ये या फीचरची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमधील या नव्या फीचरचे नाव कॅमेरा इफेक्ट्स आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने बीटा व्हर्जनमध्ये कॉल इफेक्ट्स आणि फिल्टरसाठी एआर फीचर रोलआउट केले होते. आता मेटाने व्हॉट्सअॅप कॅमेऱ्यासाठी इफेक्ट अॅप्लिकेशन फीचर आणले आहे. डब्ल्यूएबीटाइन्फोने गुगल प्ले स्टोअरवर अँड्रॉइड २.२४.२०.२० साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये हे नवीन फीचर पाहिले आहे. शेअर्ड स्क्रीनशॉटमध्ये हे नवीन फीचर तुम्ही पाहू शकता.
एक्स पोस्टमध्ये डब्ल्यूएबीटाइन्फोने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, कंपनी कॅमेरा इंटरफेसमध्ये नवीन फिल्टर बटण ऑफर करत आहे. या बटणाच्या मदतीने युजर्स फोटो आणि व्हिडीओवर फिल्टर लावू शकतात. सुरुवातीला कंपनी हे फीचर फक्त व्हिडिओ कॉलसाठी देत होती, पण आता फोटोसाठीही हे फीचर रिलीज करण्यात आले आहे. नवीन बटण आपल्याला फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यापूर्वी रिअल-टाइम अॅडजस्टमेंट करण्यासाठी टॉगल आणि बरेच फिल्टर तपासण्यास अनुमती देते.
बॅकग्राऊंड बदलणाऱ्या फिल्टर्समध्ये युजर्सला स्किन स्मूथनिंगचा पर्यायही मिळेल. सेल्फीसाठी हे फीचर अतिशय उपयुक्त आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपने कॅमेऱ्यात बॅकग्राऊंड चेंज फीचरही इंटिग्रेट केले आहे. हे सर्वप्रथम व्हिडिओ कॉलसाठी सुरू करण्यात आले होते.
या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्या रिअल वर्ल्ड बॅकग्राऊंडला ब्लर किंवा व्हर्च्युअल सीनने रिप्लेस करू शकतात. या कॅमेऱ्यात लो लाइट मोडही देण्यात आला आहे, जो कमी प्रकाशातही चांगले फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करेल. व्हॉट्सअॅपने नुकतेच बीटा युजर्ससाठी हे फीचर आणले आहे. बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्टेबल व्हर्जन ग्लोबल युजर्ससाठी रोलआउट केले जाईल.
आता व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना तुम्हाला दुहेरी मजा येणार आहे. व्हॉट्सअॅप एक नवीन कस्टमाइज्ड चॅट थीम फीचर जोडण्याच्या तयारीत आहे, जे लवकरच पर्सनल मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही व्हर्जनसाठी रोलआउट केले जाऊ शकते. हे फीचर प्रथम आयओएस २४.११.१०.७० साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये आणि नंतर अँड्रॉइड २.२४.१७.१९ साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये दिसले. हे फीचर अद्याप डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे चॅट थीम्स प्रिव्ह्यू अद्याप उपलब्ध नाही. परंतु, रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, सुरुवातीला वापरकर्त्यांना कमीतकमी १० चॅट थीम मिळू शकतात.