इराणने मंगळवारी बलुचिस्तान प्रांतात घुसून हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे दोन अड्डे उध्वस्त केले. या हल्ल्याने चवताळलेल्या पाकिस्तानने इराणवर पलटवार करत त्यांच्या सात ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. यात सात जणांचा बळी गेला आहे. पाकिस्तानने बुधवारी रात्री इराणच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, या कारवाईत बलूच दहशतवादी मारले गेले आहेत. दरम्यान इराणने म्हटले आहे की, यात कोणताही दहशतवादी मारला गेला नसून तीन महिला व चार लहान मुलांचा बळी गेला आहे. हे सर्व अन्य देशातील नागिरक होते. इराणने सांगितले की, पाकिस्तानने त्यांच्या सीमेवरील सारावानमध्ये हल्ले केले आहेत.
पाकिस्तानने म्हटले आहे की, त्याने ऑपरेशन 'मार्ग बार सरमाचार' लाँच केले आहे. 'मार्ग बार सरमाचार' बलोच भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ आहे - गुरिल्ला योद्यांचा खात्मा. पाकिस्तानने म्हटले की, ४८ तासाच्या आत आम्ही इराणला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी इराणने बलूचिस्तानातील पंजगुरमध्ये हल्ले केले होते. त्यात दहशतवादी संघटना जैश अल-फदलचे दोन अड्डे ध्वस्त केले आहेत.
दुसरीकडे पाकिस्तानने म्हटले आहे की, या हल्ल्यात तीन मुले मारली गेली आहेत. या हल्ल्याने पाकिस्तान आणि इराणमधील द्विपक्षीय संबंधही बिघडले आहेत. पाकिस्ताने इराणमधील आपले राजदूत परत बोलावले आहेत तर इस्लामाबादमधील इराणच्या राजदुतांना मायदेशी परत पाठवले आहे. पाकिस्तानआधी इराणने सीरिया आणि इराकवर हल्ले केले होते. त्यांचा दावा होता की, यातील एक हल्ल्यात त्यांनी इस्त्रायलच्या मोसादचे कार्यालय उडवले होते.