मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 06, 2024 08:29 PM IST

Sunita Williams : तिसऱ्यांदा अंतराळ मोहीमेसाठी जाणारी सुनिता विलियम्स आपल्यासोबत गणपतीची एक मूर्ती सोबत नेणार आहे. कारण गणेश देवता तिच्यासाठी लकी आहेत.

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विलियम्स मंगळवारी तिसऱ्यांदा अंतराळात झेपावणार
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विलियम्स मंगळवारी तिसऱ्यांदा अंतराळात झेपावणार (PTI)

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विलियम्स वयाच्या ५८ व्या वर्षी उद्या (मंगळवार) तिसऱ्यांना अंतराळात जाण्यासाठी तयार आहे. ती बोइंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून मंगळवारी भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजता अंतराळात झेपावणार आहे. हे यान फ्लोरिडातील केप केनवेरल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरून सोडले जाईल. स्टारलायनर यान सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांना आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राकडे घेऊन जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यापूर्वी सुनीता विलियम्स यांनी म्हटले की, ती धार्मिकपेक्षा अधिक आध्यात्मिक आहेत. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्या भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी ८ वाजता बोइंग स्टारलायनरमधून उड्डाण करेल. त्यावेळी ती गणपतीची एक मूर्ती सोबत घेऊन जाईल. कारण गणेश देवता तिच्यासाठी लकी आहेत. त्यांनी सांगितले की, अंतराळात गणेशमूर्ती सोबत असल्याने त्याला आनंद मिळेल. मागील अंतराळ यात्रेत सुनीता यांनी श्रीमद्भगवतगीता सोबत नेली होती. 

बीबीसीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की. जर ही यात्रा यशस्वी झाली तर एलन मस्कची ‘स्पेसएक्स’ सोबत ही दुसरी खासगी कंपनी बनेल जी चालक दलाला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रापर्यंत नेऊन परत आणण्यास सक्षम होईल. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी २२  मार्च रोजी पत्रकार परिषदेत स्टारलायनरच्या आगामी मोहिमेबाबत सांगितले होते. 

नासाने १९८८ मध्ये सुनीता विलियम्स यांना अंतराळवीर म्हणून निवडले होते. आता त्यांच्याकडे दोन अंतराळ मोहीमांचा अनुभव आहे. तिने एक्स्पीडिशन ३२ ची फ्लाइट इंजीनियर आणि एक्स्पीडिशन ३३ च्या कमांडर म्हणून सेवा दिली होती. पहिली अंतराळ यात्रा एक्स्पीडिशन १४/१५ वेळी विलियम्स यांनी ९ डिसेंबर २००६ रोजी एसटीएस-११६ च्या चालक दलासोबत उड्डाण केले होते. त्यानंतर ११ डिसेंबर २००६ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात पोहोचली होती.

पहिल्या वेळी सुनिता विलियम्स एकून २९ तास व १७ मिनिटे अंतराळात घालवले होते. त्याचबरोबर महिलांसाठी विश्व विक्रम केला होता. त्यानंतर अंतराळवीर पेग्गी व्हिटसन हिने २००८ मध्ये हा विक्रम मोडला.

सुनिता विलियम्सने एक्स्पीडिशन ३२/३३ मध्ये रूसी सोयुज कमांडर युरी मालेनचेंको आणि जपान एयरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजेंसीची फ्लाइट इंजीनियर अकीहिको होशिदे यांच्यासोबत कजाखस्तानच्या बैकोनूर कोस्मोड्रोनमधून १४ जुलै २०१२ रोजी अंतराळात उड्डाण केले होते.  त्यावेळी सुनिता यांनी चार महिने घालवले होते. १२७ दिवस अंतराळात घालवल्यानंतर १८ नोव्हेंबर २०१२ रोजी सुनिता पृथ्वीवर परतली होती.

IPL_Entry_Point

विभाग