General knowledge: आता महाकुंभ सुरू होण्यासाठी फक्त आठवडा राहिला आहे. यावेळी एक कोटी भाविक महाकुंभाला पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यात देशभरातील साधू-संतांचाही समावेश असेल. परंतु, साधू- संतांना पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कधी असा विचार आला आहे का, की हे लोक आपल्या डोक्यावरचे केस का वाढवतात? यामागचे कारण जाणून घेऊयात.
यावर्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ आयोजित केला जाणार आहे, जो १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यावेळी देश-विदेशातील भाविक महाकुंभात पोहोचणार आहेत. सर्व ठिकाणचे लोक विशेषत: संत महाकुंभाला येणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक फोटोंमध्ये असे दिसून येत आहे की, मोठे केस असलेले अनेक बाबा आधीच प्रयागराजला पोहोचले आहेत.
साधू- संत केस का वाढवताता, त्यामागचे कारण जाणून घेऊयात. अनेक प्राचीन ग्रंथ आणि धर्मशास्त्रात ऋषी-मुनी आणि महात्म्यांचे केस लांब असल्याचा उल्लेख आढळतो. हिंदू धर्मात लांब केस हे आध्यात्मिक ऊर्जा आणि तपश्चर्याचे प्रतीक मानले जाते. केसांमध्ये वैश्विक ऊर्जा वाहते असे म्हणतात. तर शिवभक्तांसाठी, भगवान शिवाच्या जटाजूटचे अनुसरण करणे म्हणजेच लांब मॅट केलेले केस धार्मिक श्रद्धा दर्शवतात.
ऋषी लांब केस ठेवून त्यांची उर्जा संतुलित करू शकतात. काही ठिकाणी असे मानले जाते की, लांब केस शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखतात. याचे एक कारण म्हणजे ऋषी केस कापणे टाळतात. कारण, ते त्याला निसर्गाचा भाग मानतात. ऋषी-महात्मांचे केस लांब ठेवण्यामागचे एक कारण हे आहे की, पूर्वीच्या काळी तसेच ऋषी-मुनी पर्वतावर जाऊन तपश्चर्या करायचे. तपश्चर्येत इतके तल्लीन व्हायचे की त्यांना कशाचाही भान राहायचा नाही, असे म्हटले जाते. हे देखील त्यांच्या केस मोठे असल्याचे कारण असू शकते.
कुंभमेळ्याचे स्थान ठरवण्यात ग्रहांची स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये सूर्य, चंद्र आणि गुरु या ग्रहांची स्थिती महत्त्वाची आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत आणि गुरु वृषभ राशीत असतात तेव्हा कुंभमेळा प्रयागराजमध्ये होतो. सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरतो. यासोबतच जेव्हा सूर्य सिंह राशीत असतो आणि गुरू ग्रहही सिंह राशीत असतो तेव्हा, उज्जैनमध्ये कुंभमेळा भरतो. याशिवाय सूर्य सिंह राशीत आणि गुरु सिंह राशीत किंवा कर्क राशीत असताना नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो.
कुंभमेळा दर १२ वर्षांनी आयोजित केला जातो. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभाचा आधार केवळ ज्योतिषीय गणनाच नाही तर पौराणिक कथा देखील आहेत. ज्योतिषाच्या गणनेनुसार, जेव्हा गुरु ग्रह मेष किंवा सिंह राशीत प्रवेश करतो आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे एक विशेष योग तयार होतो, तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. असे मानले जाते की ग्रहांची ही स्थिती १२ तारखेला येते. त्यामुळे दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
संबंधित बातम्या