मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news : माता न तू वैरिणी! नवजात बाळाला ओव्हनमध्ये ठेवून झोपी गेली आई; चिमूकल्याचा होरपळून मृत्यू

viral news : माता न तू वैरिणी! नवजात बाळाला ओव्हनमध्ये ठेवून झोपी गेली आई; चिमूकल्याचा होरपळून मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 11, 2024 12:20 PM IST

mother kept her newborn baby in oven and fell asleep : एका महिलेने आपल्या नवजात बाळाला झोपण्यासाठी पाळण्याऐवजी 'ओव्हन' (अन्न पदार्थ तयार करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण) मध्ये ठेवले, ज्यामुळे त्याचा होळपळून मृत्यू झाला.

mother kept her newborn baby in oven and fell asleep
mother kept her newborn baby in oven and fell asleep

mother kept her newborn baby in oven and fell asleep : अमेरिकेतील मिसुरीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या निष्काळजीपणाने तिच्या मुलाचा जीव गेला. ती आपल्या मुलाला कुठे झोपवते आहे याचे भानही महिलेला नव्हते. या महिलेने तिच्या नवजात बाळाला झोपण्यासाठी पाळण्याऐवजी 'ओव्हन'मध्ये (अन्न पदार्थ तयार करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण) ठेवले. ज्यामुळे लहान मुलाचा होरपळून मृत्यू झाला. एका सरकारी वकिलांनी शनिवारी ही माहिती दिली.

Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

या प्रकरणी कॅन्सस सिटी येथील मारिया थॉमसनावाच्या महिलेवर मुलाला जीवे मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेने हा प्रकार चुकून केला की जाणूनबुजून याचा तपास पोलीस करत आहेत. शुक्रवारी दुपारी एका अर्भकाला श्वास घेता येत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, पोलिसांनी जेव्हा मुलाला दवाखान्यात नेले तेव्हा मुलाच्या शरीरावर भाजलेल्या खुणा होत्या. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पोलिसांना एका साक्षीदाराने सांगितले की आईने "चुकून बाळाला झोपण्यासाठी पाळणाऐवजी ओव्हनमध्ये ठेवले."

खळबळजनक! अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने २० महिलांवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओही व्हायरल

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा महिलेने सांगितले की, रात्री मुलाला दूध पाजल्यानंतर तिने त्याला पाळण्यात झोपण्यासाठी तयारी करण्यास सुरुवात केली. पण बाळाला पाळण्यात झोपवण्या एवजी चुकून ओव्हनमध्ये टाकले आणि ही महिला झोपायला गेली. दरम्यान, सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला समजले की तिने चुकून मुलाला ओव्हनमध्ये झोपवले. तिने ओव्हन उघडताच त्यामध्ये मूल जळालेल्या अवस्थेत दिसले. तिने तात्काळ मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू गुदमरल्याने आणि भाजल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे.

तिने मुलाला ओव्हनमध्ये कसे ठेवले, या बाबत माहिती देण्यात आलेली नाही. "ही अत्यंत दु:खद घटना आहे. एका मुलाच्या मृत्यूमुळे आम्ही दु:खी झालो आहोत. आम्हाला विश्वास आहे की फौजदारी न्याय यंत्रणा या भीषण घटनेला योग्य प्रतिसाद देईल आणि मुलाला न्याय डेल," असे जॅक्सन काउंटीचे अभियोजक वकील जीन पीटर्स बेकर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

WhatsApp channel

विभाग