udyogini yojana scheme apply online: महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. याजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना केंद्र सरकारनेही महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू केली. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावे म्हणून ही योजना आणण्यात आली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, असे या योजनेमागचे उदिष्ट आहे.
स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली. भांडवल नसल्यामुळे अनेक महिलांना आपल्या स्वप्नांचा चुराडा करावा लागतो. मात्र, आता महिलांना माघार घेण्याची गरज नाही. उद्योगिनी योजनेंतर्ग महिलांना ३ लाखांपर्यंत कर्ज मिळवता येईल. या योजनेंतर्गत ८८ प्रकारचे उद्योग येतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत करणे, हे या योजनेमागचा उद्देश असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. सर्वात आधी कर्नाटक सरकारने ही योजना सुरु केली. त्यानंतर केंद्र सरकारने देशभर ही योजना राबवण्यास सुरुवात केली.
- १८ वर्षे ते ५५ वर्षे वयोगटातील महिला
- अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- दिव्यांग, विधवा आणि परित्यक्ता महिला.
- अर्जासह दोन पासपोर्ट साइज फोटो
- आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- शिधापत्रिकेची प्रत
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- जात पडताळणी प्रमाणपत्र
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित आहे ना? याची खात्री करुन घ्यावी. महिलांनी आधी कर्ज घेतले आहे. परंतु, त्या कर्जाची परतफेड केली नाही, अशा महिलांना कर्ज दिले जाणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. या योजनेंतर्गंत कर्ज मिळवण्यासाठी महिलांना जवळच्या बँकेत जावा लागेल.