नौदलाची ताकद वाढवणारी स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तुशीलची काय आहे वैशिष्ट्य ? शत्रूच्या नजरेस न येता हल्ला करण्यास सक्षम
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नौदलाची ताकद वाढवणारी स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तुशीलची काय आहे वैशिष्ट्य ? शत्रूच्या नजरेस न येता हल्ला करण्यास सक्षम

नौदलाची ताकद वाढवणारी स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तुशीलची काय आहे वैशिष्ट्य ? शत्रूच्या नजरेस न येता हल्ला करण्यास सक्षम

Jan 06, 2025 06:21 AM IST

INS Tushil : भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी आय एन एस तुशील स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका भारतात दाखल झाली आहे. या युद्धनौकेचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात.

नौदलाची ताकद वाढवणारी स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तुशीलची काय आहे वैशिष्ट्य ? शत्रूच्या नजरेस न येता हल्ला करण्यास सक्षम
नौदलाची ताकद वाढवणारी स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तुशीलची काय आहे वैशिष्ट्य ? शत्रूच्या नजरेस न येता हल्ला करण्यास सक्षम (AFP)

INS Tushil News : भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी आयएनएस तुशील स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका भारतात दाखल झाली आहे. रशियाच्या मदतीने ही युद्धनौका रशियात तयार करण्यात आली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सुसज्ज असलेली ही युद्धनौका शत्रूचे रडार चुकवून हल्ला करण्यास सक्षम आहे. नेमकी ही युद्धनौका काय आहे ? तिच्या क्षमता काय आहे ? या बद्दल माहिती जाणून घेऊयात.

भारतीय नौदलाचे नवीन मल्टीरोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशीलची बांधणी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथे करण्यात आली आहे. ही नौका तयार झाली असून ती ९ डिसेंबर २०२४ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलात सामील करण्यात आली होती. ही युद्धनौका आता भारतात दाखल झाली आहे.

या युद्धनौकेत काय खास आहे?

या युद्धनौकेचे नाव खास आहे. तुशील म्हणजे अभेद्य कवच म्हणजेच म्हणजेच संरक्षक कवच. या युद्धनौकेचे घोषव्याक आहे निर्भय, अभेद्य आणि मजबूत. ही युद्धनौका भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि सागरी क्षमता वाढवणार आहे. ही युद्धनौका क्रिवाक क्लास-3 फ्रिगेट म्हणजेच प्रोजेक्ट ११३५.६ प्रकल्पा अंतर्गत बांधली गेली आहे. ही युद्धनौका तलवार क्लास वर्गातील अपग्रेट युद्धनौका आहे.

आयएनएस तुशीलचे वजन ३ हजार ८५० टन आहे. या युद्धनौकेची लांबी ४०९.५ फूट आहे. तयार युद्धनौकेचा बीम ४९.१० फूट व ड्राफ्ट १३.९ फूट आहे. ही युद्ध नौका समुद्रात कमाल ५९ किमी/तास वेगाने धावू शकते. जर वेग २६ किमी/ताशी वाढवला तर ही युद्धनौका समुद्रात ४८५० किमीचा पल्ला गाठू शकते. जर युद्धनौकेचा वेग हा ५६ किमी प्रतीतास वेगाने केल्यास ती २६०० किमीपर्यंत जाऊ शकते.

१८० नौदल कर्मचारी अधिकारी राहण्याची क्षमता

ही युद्धनौका १८ अधिकाऱ्यांसह १८० सैनिकांना घेऊन ३० दिवस समुद्रात तैनात राहू शकते. ही युद्धनौका इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीने सुसज्ज आहे. या युद्धनौकेवर ४ केटी २१६ डेकोय लाँचर बसवण्यात आले आहे. यात २४ मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. या सोबतच ८ इग्ला १ ई लॉन्च अँटी-शिप मिसाईल, ८ व्हर्टिकल लॉन्च अँटी-शिप आणि लँड ॲटॅक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे देखील तैनात करण्यात आली आहेत. १०० एमएम ए १९० ई नेव्हल गन बसवण्यात आली आहे. याशिवाय ७६ मिमीची ओटो मेलारा नौदल तोफा बसवण्यात आली आहे. २ एकए ६३० सीआयडब्ल्यूएस आणि २ कस्टन सीआयडडब्ल्यूएस तोफा बसवण्यात आल्या आहेत. या घातक तोफांव्यतिरिक्त, दोन ५३३ मिमी टॉर्पेडो ट्यूब देखील या युद्धनौकेत बसवण्यात आले आहेत. आधुनिक रॉकेट लाँचरही बसवण्यात आले आहे. ही युद्धनौका कामोव-२८ किंवा कामोव्ह-३१ किंवा ध्रुव हेलिकॉप्टरने वाहून नेण्यासशी सक्षम आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर