Meaning Of Sir and Madam: आपण नेहमीच ‘सर’ आणि ‘मॅडम’ या दोन शब्दांचा वापर करत असतो. लहान मुलांपासून थोरांपर्यंत या शब्दांचा वापर वाढला आहे. या शब्दांचा वापर इतका वाढला आहे की, आपण सामान्य संभाषणात त्याचा वापर करू लागलो आहोत. हे शब्द आता प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला आहे. असा कोणताच व्यक्ती नसेल, ज्याने कधीच या दोन शब्दांचा वापर केला नाही. शाळा, महाविद्यालयमध्ये या शब्दांचा वापर अत्यंत सामन्य आहे. परंतु, या शब्दाचा अर्थ काय आहे? हे दोन्ही शब्द कुठून आले, याबाबत क्वचितच लोकांना माहिती असेल. आज आपण सर आणि मॅडम शब्दाचा अर्थ जाणून घेऊ.
आदरणीय व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांच्या नावापुढे सर हा शब्द जोडला जातो, जसे मराठीमध्ये श्री अशा शब्दाचा वापर केला जातो. पण सर हा शब्द नेमका आला कुठून असाही अनेकांना प्रश्न पडतो. तर, सर हा शब्द फ्रेंच शब्द Sire पासून बनला आहे. त्याचा उपयोग मोठ्या माणसाला संबोधण्यासाठी केला जातो. सर हे राजकीय आणि मुत्सद्दी कारणांसाठी दिलेला सन्मान आहे, जे ब्रिटिश राजवटीत मोजक्याच भारतीयांसमोर सर हा शब्द जोडून त्यांना सन्मान दिला गेला.
मॅडम शब्दाचा अर्थही सर शब्दाशी जुडीत आहे. पुरुषांना सर बोलून जो सन्मान दिला जातो, तोच सन्मान महिलेला मॅडम शब्दामुळे मिळतो. कॉलिन्स डिक्शनरीनुसार मॅडम हा शब्द 'माय डेम' या शब्दापासून बनला आहे. डेम हा शब्द लॅटिन डोमिना मधून आला आहे. जे डोमिनसचे स्त्रीलिंगी रूप आहे, ज्याचा अर्थ लॉर्ड किंवा मास्टर असा होतो. मात्र, आता डेम हा शब्द आक्षेपार्ह मानला जात आहे. एकेकाळी डेम हा शब्द विवाहित स्त्री किंवा जबाबदार पदावर असलेल्या स्त्रीसाठी वापरला जायचा. आता त्याऐवजी मॅडम हा शब्द वापरला जातो. आपण शाळेपासून नोकरीला लागू पर्यंत सर आणि मॅडम बोलत आलो. मात्र, या दोन शब्दांचा अर्थ काय आहे, याचा कधीच विचार केला नाही.
संबंधित बातम्या