Kumbh Mela 2025: प्रयागराज येथे आजपासून महा कुंभमेळा सुरू होणार आहे. हिंदू धर्मात प्रयागराज मध्ये आयोजित महाकुंभाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. इथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा संगम होतो त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. भारतातील प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणी महा कुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का प्रयागराज आणि हरिद्वार कुंभमध्ये काय फरक आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
प्रयागराजमध्ये होणारा कुंभमेळ्याला महाकुंभ असे म्हणतात, जे दर १२ वर्षांनी आयोजित केले जाते. प्रयागराजमध्ये शेवटचा महाकुंभ २०१३ मध्ये आयोजित करण्यात आला, त्यानंतर २०२५ मध्ये प्रयागराजमध्ये पुन्हा कुंभमेळा आयोजित आला आहे. आता प्रश्न असा आहे की, कुंभमेळा फक्त प्रयागराजमध्येच आयोजित केला जातो का? पण तसे नाही. प्रयागराज व्यतिरिक्त, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथेही कुंभमेळा आयोजित केला जातो.
हा कुंभमेळा १२ वर्षांच्या अंतराने साजरा केला जातो, यासाठी चारही ठिकाणे एक-एक करून निवडली जातात. या काळात भाविक गंगा, क्षिप्रा, गोदावरी आणि संगममध्ये स्नान करतात. दर सहा वर्षांनी अर्धकुंभ साजरा केला जातो. अर्धकुंभ फक्त दोन ठिकाणी म्हणजेच प्रयागराज आणि हरिद्वार येथे आयोजित केले जाते. हे दर सहा वर्षांनी आयोजित केले जाते.
आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, कुंभमेळा कुठे भरवायचा हे कोण निवडते. हा निर्णय ज्योतिषशास्त्रीय गणनेच्या आधारे घेतला जातो. यासाठी हिंदू ज्योतिषशास्त्रातील मुख्य ग्रह म्हणजे - गुरु आणि सूर्य. जेव्हा गुरु कुंभ राशीत असतो तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो.
समुद्रमंथनाच्या वेळी निघालेल्या भांड्यातून अमृताचे काही थेंब सांडून अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेली कुंभस्नानाची परंपरा आजपासून सुरू झाली. यावेळी १८३ देशांतील लोक महाकुंभात येण्याची अपेक्षा आहे. या परदेशी पाहुण्यांचे स्वागत आणि आतिथ्य करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने मोठी तयारी केली आहे.
१२ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०१३ च्या कुंभमेळ्यासाठी १२१४ कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले होते. त्या काळात १६० किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. स्वच्छतेसाठी ३५ हजार शौचालये बांधण्यात आली. आकडेवारीनुसार, २०१३ च्या कुंभमेळ्यात सुमारे ७० लाख भाविकांनी शहरात भेट दिली होती, परंतु यावेळी ४५ कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या