What is Stealthing: ब्रिटनमधील ब्रिक्सटनमध्ये एका तरुणाला एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दोघांमध्ये शारीरिक संबंध महिलेच्या संमतीनेच झाले होते. कोर्टात आरोपी दोषी आढळून आला. या प्रकरणी त्याला ४ वर्षे ३ महिन्यांची शिक्षा झाली. घडलेल्या या प्रकाराला स्टेलटिंग म्हटले जाते. यात जर शरीर संबंध ठेवतांना जर महिलेच्या परवानगीशिवाय कंडोम काढले तर तो बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो.
स्टेलटिंग हा देखील बलात्कार मानला जातो. याचा अर्थ असा की जेव्हा महिला व पुरुष सुरक्षित यौन संबंध ठेवण्याच्या अटीसह लैंगिक संबंध ठेवण्यास सहमत होतात. परंतु जर पुरुषाने महिलेच्या न कळत किंवा तिला याची माहिती न देता किंवा कंडोम घालले असे खोटे सांगून शरीर संबंध ठेवल्यास त्याला स्टेल्टिंग म्हणतात.
मिररमधील वृत्तानुसार, ३९वर्षीय काई गाई मुकेंडी याने त्याच्या मैत्रिणीसोबत अशा प्रकारचे शरीर संबंध ठेवण्यास समंती घेतली होती. मात्र, शरीर संबंध ठेवतांना त्याने महिलेच्या नकळत कंडोम काढले. ही बाब जेव्हा महिलेला समजली तेव्हा या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. या ठिकाणी गाई हा दोषी आढळला. यामुळे कोर्टाने त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आली आहे. अहवालानुसार, ब्रिक्सटन आणि मुकेंडी येथील एका महिलेने संरक्षण वापरण्याच्या अटीवर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र, मुकेंडी यांनी संमतीशिवाय कंडोम काढून टाकला होता.
या घटनेची माहिती पीडितेने ९ मे रोजी पोलिसांना दिली होती. यानंतर तपास सुरू केला असता आरोपीने महिला आणि मुकेंदीमधील मेसेज डिलीट केल्याचे आढळून आले. यातील काही मेसेजमध्ये त्याने केलेल्या स्टिल्टिंगबद्दल पीडितेची माफीही मागत होता. हे पुरावेही मुकेंडीला दोषी ठरविण्यात मदत करणारे ठरले आहेत.
संबंधित बातम्या