आजघडीला आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे देखील नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅन आणि आधार कार्ड कोणत्याही आर्थिक कामासाठी आवश्यक असते, परंतु सध्या पॅन कार्डशी संबंधित एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) ग्राहकांना त्यांच्या खात्यातून २४ तासांच्या आत पॅन माहिती अपडेट करण्यास सांगितले जात आहे आणि तसे न केल्यास अकाऊंट बंद करण्यात येईल, अशी वॉर्निंग दिली जात आहे. पण पीआयबीने (PIB) या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले असून अशा पोस्ट पूर्णपणे फेक असल्याचे म्हटले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांशी संबंधित एक फेक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ग्राहकांना २४ तासांच्या आत त्यांच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात पॅनशी संबंधित माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिले जात आहेत आणि तसे न केल्यास ग्राहकांची खाती बंद केली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
ही पोस्ट पाहून खातेधारक चिंतेत पडले आहेत. पण ही पोस्ट आणि व्हायरल करण्यात येणारे मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे समोर आले आहे. @IndiaPostOffice कडून असा कोणताही मेसेज पाठवण्यात आलेला नाही, असे पीआयबीने स्पष्टपणे म्हटले आहे.
PIB ने सोशल मीडियावर या पॅन कार्ड घोटाळ्याची माहिती शेअर करत पोस्ट केले आहे आणि अशा दाव्यांना खोटे ठरवून, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खातेधारकांना फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे.
फॅक्ट चेकमध्ये अशा पोस्ट फसव्या असल्याचे आढळून आले आहे आणि असे म्हटले आहे की इंडिया पोस्टने असे संदेश पाठवले नाहीत आणि पाठवणार नाहीत. पीआयबीनुसार, अशा बनावट मेसेज किंवा पोस्टमध्ये संशयास्पद लिंक असते, ज्यामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ शकते.
पॅन कार्डशी संबंधित या घोटाळ्याबद्दल युजर्सना सावध करण्याबरोबरच, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने असा सल्लाही दिला आहे, की लोकांनी या मेसेजमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणे किंवा वैयक्तिक माहिती सामायिक करणे टाळावे. कारण हे पूर्णपणे फेक आहे. इंडिया पोस्ट कधीही कोणताही मेसेज पाठवत नाही.
पीआयबीने या संदर्भात पॅन कार्ड युजर्स आणि इंडिया पोस्टच्या ग्राहकांना आधीच सावध केले आहे आणि आता पुन्हा एकदा अशी पोस्ट व्हायरल झाल्यास इशारा दिला आहे.
यामध्ये पीआयबीने ग्राहकांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की बँक खात्याची माहिती आणि पॅन कार्ड कोणाशीही शेअर करू नये असे सांगितले आहे. कारण सायबर गुन्हेगार अनेकदा असे बनावट मेसेज आणि लिंक पाठवून लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.
संबंधित बातम्या