Israel Unit 8200 : मोसाद नव्हे, इस्रायलच्या 'या' गुप्तचर संघटनेने घडवले लेबनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकीचे स्फोट-what is israel unit 8200 which makes pager and walkie talkie attacks ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Israel Unit 8200 : मोसाद नव्हे, इस्रायलच्या 'या' गुप्तचर संघटनेने घडवले लेबनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकीचे स्फोट

Israel Unit 8200 : मोसाद नव्हे, इस्रायलच्या 'या' गुप्तचर संघटनेने घडवले लेबनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकीचे स्फोट

Sep 19, 2024 01:49 PM IST

Israel Unit 8200 : इस्रायलच्या सीक्रेट 'युनिट ८२००' ची चर्चा सध्या जगात जोरात सुरू आहे. इस्रायली लष्कराची हे सायबर युनिट आहे. लेबनॉनमध्ये जे पेजर स्फोट झाले आहेत ते स्फोट या युनिटने केले असल्याचं पाश्चिमात्य देशांच म्हणणं आहे.

मोसाद नव्हे तर इस्रायलच्या 'या' गुप्त संघटनेने घडवले लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट
मोसाद नव्हे तर इस्रायलच्या 'या' गुप्त संघटनेने घडवले लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट

Israel allegedly Planned Hezbollah Lebanon Pager Attack : मंगळवारी आणि बुधवारी लेबनॉन पेजर्स आणि वॉकी टॉकीमध्ये झालेल्या साखळी स्फोटांनी हादरले. यात हिजबुल्लाहच्या शेकडो दहशतवाद्यांसह संपूर्ण देशात २,८०० लोक जखमी झाले. मंगळवारी ९ तर बुधवारी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्फोट झाले. हिजबुल्लाहच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की ‘वॉकी-टॉकी’ आणि सौर उपकरणांमध्ये देखील स्फोट झाले. हे स्फोट होताच इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादवर संशय घेण्यात आला. मात्र, हे स्फोट मोसाद नव्हे तर इस्रायलची गुप्तचर सायबर शाखा ‘युनिट ८२००’ने हे घडवून आणले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. युनिट ८२०० ही संस्था इस्रायलच्या मोसादपेक्षा वेगळी आहे.

पेजर हल्ला आणि वॉकीटॉकीत स्फोट घडवून लेबनॉनमध्ये खळबळ माजवणाऱ्या इस्रायलने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. आतापर्यंत इस्रायलने केवळ क्षेपणास्त्रविरोधी हल्ला किंवा बॉम्बफेक करण्याच्या आयर्न डोम तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलं होते, परंतु यावेळी त्यांनी तांत्रिक युद्धाद्वारे शत्रूवर हल्ला करण्यात देखील महारत मिळवली आहे.

लेबनॉनमध्ये सुमारे ५ हजार पेजर्सचा स्फोट झाला, ९ लोक ठार झाले आणि सुमारे २ हजार जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर नंतर वॉकीटॉकी स्फोटामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. हे दोन्ही हल्ले सलग दोन दिवसांत झाले. या हल्ल्यांदरम्यान, इस्रायलच्या गुप्तहर शाखा 'युनिट ८२००' ची चर्चा जोरात सुरू आहे. लेबनॉनमध्ये जे स्फोट झाले ते या संघटनेने केले असल्याचं पाश्चात्य देशांचे म्हणणे आहे. इस्त्रायली लष्कराचे हे इंटेलिजन्स युनिट आहे. आत्तापर्यंत इस्रायलने या हल्ल्यांबाबत मौन बाळगले आहे, परंतु पाश्चात्य देश आणि लेबनॉनला इस्रायलच्या या गुप्त युनिटने हे हल्ले केले असल्याचा संशय आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ५००० पेजर्समध्ये एकाच वेळी स्फोट घडवण्यात आला. यात आत सुमारे 3 ग्रॅम स्फोटके ठेवण्यात आली होती. युनिट-८२०० ही सायबर संस्था पेजर्स व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाली होती. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटकं बसवणे, रिमोट-कंट्रोलद्वारे त्यांचं नियंत्रण मिळवणे व एकाच वेळी त्यांचा स्फोट घडवून आणणे या तिन्ही गोष्टींवर ‘युनिट-८२००’ ने अनेक महिने काम केलं होतं.

एका पाश्चात्य सुरक्षा सूत्राचे म्हणणे आहे की युनिट ८२०० हे इस्रायली सैन्याची संघटना आहे. युनिट ८२०० मधील सदस्य हे त्यांच्या क्षेत्रातले तगडे व गुणी कर्मचारी आहेत. इस्रायलची संरक्षण क्षमता, सायबर सुरक्षा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यामुळेच हिजबुल्लावर एवढा मोठा तांत्रिक हल्ला करण्यात ते यशस्वी झाले आहेत.

युनिट ८२०० ला स्वतः इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटके कशी ठेवता येतील याचा बराच काळ अभ्यास करत होते. इस्रायली लष्कराने या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय पीएम ऑफिसकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.

माजी गुप्तचर अधिकारी आणि इस्रायलच्या डिफेन्स अँड सिक्युरिटी फोरमचे रिसर्च डायरेक्टर योसी कुपरवासर यांनी रॉयटर्सला सांगितलं की, या हल्ल्यात लष्करी गुप्तचर युनिटचा सहभाग होता की नाही हे स्पष्ट झाले नाही. युनिट ८२०० चे सदस्य इस्रायली लष्कराचे सर्वात घातक सदस्य आहेत. या तुकडीत फक्त तरुण आणि विशेष सैनिकांचा समावेश आहे. ते इंटेलिजन्स गोळा करण्यात तरबेज आहेत. २०१८ मध्ये याच इस्रायली युनिटने इस्लामिक स्टेटवर हवाई हल्ला केला होता. युनिट ८२०० व या संस्थेतील कर्मचारी शत्रू राष्ट्रांची माहिती गोळा करणे, ती माहिती गुप्तचर यंत्रणा व संरक्षण यंत्रणांना पुरवणे, त्या माहितीचं विश्लेषण करणे, सायबर सुरक्षा पुरवणे यांसारखी कामे करतात. या युनिटची थेट यूएस नॅशनल सिक्योरिटी एजन्सीशी तुलना केली जाते. इस्रयली सरकार युनिट-८२०० च्या कारवाया व मोहिमांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर पडू देत नाही.

Whats_app_banner