Voter ID: तुमचं मतदान ओळखपत्र हरवलंय? चिंता नको, घरबसल्या असं करा डाउनलोड!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Voter ID: तुमचं मतदान ओळखपत्र हरवलंय? चिंता नको, घरबसल्या असं करा डाउनलोड!

Voter ID: तुमचं मतदान ओळखपत्र हरवलंय? चिंता नको, घरबसल्या असं करा डाउनलोड!

Published Mar 16, 2024 05:44 PM IST

How to Download Voter ID Card: ऑनलाईन पद्धतीने मतदान ओळखपत्र कसे डाऊनलोड करायचे? याची प्रक्रिया जाणून घेऊयात.

Voter ID Card
Voter ID Card

Voter ID Card Download Online: लवकरच संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. दरम्यान, तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असल्यास अथवा सापडत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. आता घरबसल्या सहज मतदान ओळखपत्र डाउनलोड करता येऊ शकते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणूक आणि अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिसा या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. या निवडणुकांपूर्वी ज्या लोकांचे मतदान ओळखपत्र हरवले आहे, त्यांच्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

 

मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

  •  सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  •  त्यानंतर Form6 वर जाऊन Apply online for registration of new voter ID वर क्लिक करा.
  •  पुढे New User पर्यायावर क्लिक करा आणि तिथे तुमचे नाव, वय आणि लिंग इत्यादी माहिती सबमिट करा.
  •  त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल.
  •  मग तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरिफाय करू शकतील.
  •  संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  •  यानंतर तुमच्या फोन आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक अ‍ॅप्लिकेशन नंबर प्राप्त होईल.
  •  या नंबरचा उपयोग मतदान ओळखपत्राचे स्टेट्स चेक करण्यासाठी होईल.
  •  या संपूर्ण प्रक्रियेनंतर मतदान ओळखपत्र डाउनलोड करावे.

लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. पहिल्या टप्पा- १९ एप्रिल २०२४, दुसरा टप्पा- २६ एप्रिल २०२४, तिसरा टप्पा- ७ मे २०२४, चौथ्या टप्पा- १३ मे २०२४, पाचवा टप्पा- २० मे २०२४, सहावा टप्पा- २५ मे २०२४ आणि सातव्या टप्प्यासाठी १ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर