Viral News : जर्मन कंपनीने बनवले 'डिजिटल कंडोम'! सोशल मिडियावर झाले व्हायरल, नेटकरी म्हणाले....
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : जर्मन कंपनीने बनवले 'डिजिटल कंडोम'! सोशल मिडियावर झाले व्हायरल, नेटकरी म्हणाले....

Viral News : जर्मन कंपनीने बनवले 'डिजिटल कंडोम'! सोशल मिडियावर झाले व्हायरल, नेटकरी म्हणाले....

Published Oct 27, 2024 09:53 AM IST

digital condom viral news : जगातील विविध कंपन्या वेगवेगळी उत्पादने विकसित करत असतात. काही उत्पादने तर नागरिकांना चकित करतात. अशीच एक यंत्र जर्मन कंपनी बिली बॉयने तयार केली आहे. हे यंत्र पाहून तुम्ही देखील आश्चर्य चकित व्हाल.

जर्मन कंपनीने बनवले 'डिजिटल कंडोम'! सोशल मिडियावर झाले व्हायरल, नेटकरी म्हणाले....
जर्मन कंपनीने बनवले 'डिजिटल कंडोम'! सोशल मिडियावर झाले व्हायरल, नेटकरी म्हणाले....

digital condom viral news : शरीर संबंध ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. लैंगिक संबंध ठेवतांना काळजी न घेतल्यास अनेक आजार देखील उद्भवू शकतात. या साठी कंडोम तयार करण्यात आले. या माध्यमातून सुरक्षित यौन संबंध ठेवणे सोईचे झाले आहे. बाजारात विविध प्रकारचे कंडोम उपलब्ध आहेत. मात्र, आता जर्मनीच्या एका कंपनीने डिजीटल कंडोम तयार केले आहे. हे कंडोम सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या बाबत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  ‘अ‍ॅज ईझी अ‍ॅज युजिंग अ रिअल कंडोम’ अशा जाहिरातीच्या  टॅगलाइनसह हे कंडोम मार्केटमध्ये आणण्यात आले आहे. हे कंडोम नेमके काय आहे. त्याचा वापर कसा करायकहा असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. 

  जगातील कंपन्या लोकांना आश्चर्यचकित करणारी वेगवेगळी उत्पादने बनवत असतात. जर्मन कंपनी बिली बॉयने बेडरूममधील सर्व डिव्हाइसेसचा कॅमेरा आणि मायक्रोफोन ब्लॉक करण्यासाठी या डिजीटल कंडोमची निर्मिती केली आहे. या यंत्रामुळे खासगी क्षणांचे कोणत्याही डिजिटल डिव्हाइसद्वारे कोणताही व्हिडिओ आणि आवाज रेकॉर्ड करणे अशक्य होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या डिजिटल कंडोमला ‘कॅमडॉम अ‍ॅप’ (CAMDOM App) असं नाव देण्यात आलं आहे.

काय आहे डिजीटल कंडोम?

अ‍ॅपचे डेव्हलपर फेलिप आल्मेडा (Felipe Almeida) यांनी याबाबत माहिती देतांना म्हटलं आहे की, स्मार्टफोन्स हे मानवाचा अविभाज्य भाग बनले आहेत. आपण त्यावर भरपूर संवेदनशील माहिती साठवतो. या फोनमध्ये परवानगी नसताना कंटेंट रेकॉर्डिंगपासून वापरकर्त्याचे संरक्षण करण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.  हे अ‍ॅप ब्लूटूथ वापरून तुमचा कॅमेरा आणि माइक ब्लॉक करू शकतं, असे फेलीप यांनी म्हटलं आहे.   या अ ॅपमध्ये एक सुरक्षा यंत्रणा देण्यात आली आहे, ज्या द्वारे  एखादी व्यक्ती किंवा अॅप कॅमेरा किंवा मायक्रोफोन चालू करण्याचा प्रयत्न केल्यास ते अलार्म वाजेल. कंपनीचा दावा आहे की, या अॅपचा वापर केल्याने तुमच्या अंतरंग क्षणांचे व्हिडिओ किंवा आवाज रेकॉर्ड करता येणार नाहीत. लैंगिक संबंधांदरम्यान आपल्या पार्टनरला आपल्या परवानगीशिवाय व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करता येऊ नये, या उद्देशाने हा कंडोम डिझाइन करण्यात आला आहे. कंपनीच्या या उत्पादनावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामुळे आजच्या नात्यांमध्ये संमती आणि डिजिटल प्रायव्हसीवर चर्चा सुरू झाली आहे.

कसा वापरायचा डिजीटल कंडोम?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे अ‍ॅप स्वरूपातील हे कंडोम वापरण्यासाठी युझर्सनी सेक्स करण्यापूर्वी आपापले स्मार्टफोन जवळ ठेवणं गरजेचं आहे. फोन शेजारी ठेवल्यानंतर ‘ब्लॉक ऑल कॅमेराज आणि मायक्रोफोन्स’ हे व्हर्च्युअल बटण खाली स्वाइप केल्यावर  एखाद्या युजरने यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजेल व  ज्या व्यक्तीला रेकॉर्डिंगचा धोका असू शकतो, ती सावध होईल. हे अ‍ॅप एकाच वेळी अनेक उपकरणं ब्लॉक करतं असा दावा कंपनीने केला आहे. 

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने  लिहिले, "थांब बाळा, अ‍ॅप अजूनही अपडेट होत आहे. आणखी एकाने लिहिले की, "शेवटी फोन सेक्ससाठी सुरक्षित खबरदारी. मला 'आय लव्ह यू' व्हायरसपासून सुरक्षित राहावं लागेल. आणखी एका युजरने लिहिलं, "डिजिटल कंडोम? आपण आता टेक्नॉलॉजी इनोव्हेशनचे वेडे होत आहात. दुसऱ्याने  लिहिले की, "दुर्दैवाने, हे आपल्या समाजासाठी महत्वाचे तंत्रज्ञान आहे.

या अ‍ॅपबद्दल बोलताना बिली बॉयचे ब्रँड मॅनेजर म्हणाले की, "आम्हाला पुढचे पाऊल उचलायचे होते आणि डिजिटल पिढीला अशा धोक्यापासून वाचवायचे होते ज्याचा सामना सामान्य कंडोम करू शकत नाही, परंतु डिजिटल कंडोम करू शकतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर