राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील प्रसिद्ध दिवंगत ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात नुकतच केलेलं आक्षेपार्ह विधान त्यांना चांगलच भोवणार असल्याचं दिसतय. प्रा. वेलिंगकर यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आज दिवसभरात वेलिंगकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर प्रा. वेलिंगकर यांच्याविरोधात गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर काही संघटनांनी बिचोलिम येथे त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून प्रा. वेलिंगकर भूमिगत झाले असून पोलिसांना सापडले नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो आता न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, बिचोलिम पोलिसांनी बजावलेल्या नोटिस नुसार प्रा. वेलिंगकर यांनी पोलिसांमसक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रा. वेलिंगकर यांना शोधण्यासाठी पोलिसांनी खास शोध पथकांची स्थापना केली असून गोवा तसेच राज्याच्या बाहेर या टीम जाणार आहे. गोव्यातील आम आदमी पार्टीचे आमदार क्रूज सिल्वा, सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव आणि झिना परेरा यांनी प्रा. वेलिंगकर यांच्याविरोधात ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना भडकावल्या असल्याचं सांगत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
प्रा. सुभाष वेलिंगकर हे गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आहेत. गोव्यात सध्या भाजपचे सरकरा आहे. मराठी भाषेच्या मुद्दावर वेलिंगकर यांनी अनेक आंदोलनं केली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वेलिंगकर सतत चर्चे असतात. असेच एक वक्तव्य वेलिंगकर यांनी गोव्यातील ख्रिश्चनांचे धर्मगुरू असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केले होते. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे डीएनए तपासण्यात यावे, असं वक्तव्य वेलिंगकर यांनी केले होते. यामुळे गोव्यातील ख्रिश्चन धर्मियांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. वेलिंगकर यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी गोव्यात ख्रिश्चन बाधवांनी ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे काढेल आहे.
ख्रिश्चन धर्मप्रसारक असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर (Saint Francis Xavier) यांना ‘गोयंचो सायब’ असं म्हटलं जातं. त्यांचा जन्म ७ एप्रिल १५०६ रोजी स्पेनमध्ये झाला होता. तेव्हाच्या पोपच्या संमतीने ते १३ महिने प्रवास करून १५४२ साली गोव्यात दाखल झाले होते. गोव्यात काही काळ थांबल्यानंतर ते पुढे श्रीलंका आणि जपानलाही गेले होते. १५५२ साली ते पुन्हा गोव्यात परत आले होते. त्यानंतर त्याच वर्षी चीनला जाण्यासाठी प्रवास करत असाना चीनच्या सांगचुआन बेटावर त्यांचे निधन झाले होते. १५५४ साली सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव चीनच्या बेटावरून गोव्यात आणले गेले. तेव्हापासून गेले साडेचारशे वर्ष त्यांचे शव गोव्यातील बॅसलिका बॉम जिझस चर्चमध्ये ठेवण्यात आले आहे. दर दहा वर्षातून एकदा येथे शव प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी नोव्हेंबरमध्ये हा सोहळा होणार आहे.
संबंधित बातम्या