Blue Moon 2024 Date: या महिन्यात दिसणार ब्लू मून; जाणून घ्या तारीख, वेळ आणि ठिकाण-what is blue moon 2024 date time and where to watch the rare event this month ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Blue Moon 2024 Date: या महिन्यात दिसणार ब्लू मून; जाणून घ्या तारीख, वेळ आणि ठिकाण

Blue Moon 2024 Date: या महिन्यात दिसणार ब्लू मून; जाणून घ्या तारीख, वेळ आणि ठिकाण

Aug 10, 2024 12:50 PM IST

What is Blue Moon 2024: या महिन्यात ब्लू मून दिसणार आहे. ब्लू मून नेमका कधी आणि कुठून दिसणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ब्लू मून म्हणजे काय? वाचा
ब्लू मून म्हणजे काय? वाचा (Bloomberg)

Blue Moon Date and Time: महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन ऑगस्ट महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ असे म्हटले जाते. भारतीय वेळेनुसार, येत्या १९ ऑगस्ट रोजी दुपारी ०२.२६ वाजता हा ‘ब्लू मून’ पाहण्याचा योग येणार आहे. याबाबत space.com वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात आली. शेवटचा ब्ल्यू मून ३० ऑगस्ट २०२३ रोजी पाहायला मिळाला.

जगभरातील संस्कृतींमध्ये ब्लू मून हा खगोलशास्त्रीय चमत्कार मानला जातो. ब्लू मूनसोबत विविध धार्मिक आणि सामाजिक श्रद्धाही जोडल्या गेल्या आहेत. ब्लू मूनच्या दिवशी चंद्राचा आकार नेहमीपेक्षा १४ टक्के अधिक मोठा दिसतो. एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात. ब्लू मूनबाबत थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर, एका वर्षात चार ऋतू असतात. प्रत्येक ऋतूत तीन पौर्णिमा असतात. परंतु, एखाद्या ऋतूत चार पौर्णिमा आल्यास चंद्राला ब्लू मून असे म्हटले जाते. असे दृश्य आपल्याला साधारणत: दोन ते तीन वर्षाच्या कालावधीनंतर पाहायला मिळते.

ब्लू मून कधी असते?

एका वर्षात ३६५ दिवस असतात. एका वर्षात चंद्र पृथ्वीभोवती १२.२७ प्रदक्षिणा मारतो. एका वर्षातील १२ महिन्यात प्रत्येकी पौर्णिमा असते. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या १२ वेळा प्रदक्षिणा करून ११ दिवस जास्त असतात. प्रत्येक वर्षातील या अतिरिक्त दिवसांना जोडले तर, दोन वर्षात ही संख्या २२ होते आणि तीन वर्षात ही संख्या ३३ असते. यामुळे दर २ ते ३ वर्षांनी एक अतिरिक्त पौर्णिमा येते.

ब्लू मून कॅप्चर करण्याचा उत्तम मार्ग

ब्लू मूनचे सर्वोत्तम स्नॅपशॉट्स हाय-डेफिनेशन आणि अॅडव्हान्स कॅमेऱ्यांमधून मिळू शकतात. तथापि, लोक त्यांच्या स्मार्टफोनसह ब्लू मूनचे आश्चर्यकारक शॉट्स देखील छोट्या बदलांसह घेऊ शकतात. सर्वप्रथम ब्ल्यू मून शिखरावर असताना फोटो क्लिक करणं गरजेचं आहे. पुढे, आपला फोन पूर्ण पणे चार्ज ठेवा जेणेकरून आपण फोटो क्लिक करण्याची एकही संधी गमावणार नाही. पुढची प्रक्रिया म्हणजे एक चांगली जागा शोधणे जिथे आपण चंद्राचे सर्वात स्पष्ट आणि सर्वोत्तम दृश्य मिळवू शकता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे तो म्हणजे फोटोची रचना. आपल्या फोटोंना संदर्भ जोडणे नेहमीच मनोरंजक असते. रिकाम्या आकाशात चंद्राचे अस्पष्ट आणि कंटाळवाणे फोटो क्लिक करण्याऐवजी झाडांमधून डोकावणारे किंवा दोन इमारतींच्या मध्ये उगवणारे चंद्र इतर दृश्यांचा विचार करा. वेगवेगळे अँगल आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा फोटो हाय-डेफिनेशन कॅमेरा नव्हे तर स्मार्टफोनवरून क्लिक केल्यानंतरही छान दिसेल.

विभाग