Bank News: देशातील काही बँक काही कारणास्तव कायमच्या बंद पडतात. मात्र, बँक बंद झाल्याने त्या बँकेतील खातेदारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, जर एखादी बँक बंद पडली तर सर्वात जास्त नुकसान सरकारचे होते की सर्वसामान्यांचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.
भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील मुख्य बँक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व बँकांना परवाने जारी करते. पण अनेक वेळा बँकांची आर्थिक कोंडी पाहता रिझर्व्ह बँक त्या बँकेचा परवाना रद्द करून बँक बंद करण्याचे आदेश देते.
बँक बंद झाल्यामुळे त्या बँकेच्या ग्राहकांचे सर्वाधिक नुकसान होते. कारण बँक ग्राहकांच्या खात्यात जमा झालेले पैसे अडकतात. त्यामुळे ग्राहकांचे प्रचंड हाल होतात. बँका बंद पडल्याने सरकारचे कोणतेही नुकसान होत नाही. सरकारचे नुकसान एवढेच आहे की, जर त्या बँकेत मोठ्या संख्येने लोकांची खाती असतील तर ते पैसे परत मिळतील, अशी जनतेची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर, यामुळे राज्य सरकार पडण्याचाही धोका निर्माण होतो.
डीआयसीजीसी कायद्यानुसार बँक ठेवीदारांना फक्त ५ लाख रुपये परत मिळू शकतात. म्हणजेच एखादी बँक कायमची बंद पडली, तर त्यामध्ये खाते अससेल्या ग्राहकाचे ५ लाख रुपयांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहतात. डीआयसीजीसी कायदा,१९६१ च्या कलम १६ (१) अन्वये, जर बँक कोणत्याही कारणास्तव बंद पडली तर, डीआयसीजीसी प्रत्येक ठेवीदाराला त्यांचे पैसे परत करण्याची जबाबदार घेते. ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर ५ लाख रुपयांपर्यंतचा विमाही मिळतो. नियमांनुसार, बँक बंद झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. जर ठेव रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर, तुम्हाला लिक्विडेशन प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.
संबंधित बातम्या