Indian Railway: पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर येथे अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून wcr.indianrailways.gov.in येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील ३ हजार ३१७ पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरतीसाठीन ५ ऑगस्ट २०२४ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, ४ सप्टेंबर २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे. या भरती अंतर्गत कोणत्या भागात किती पदे भरली जाणार आहेत, हे जाणून घेऊयात.
उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह दहावीची परीक्षा किंवा तत्सम (१० + २ परीक्षा प्रणालीअंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी) वगळता इतर सर्व ट्रेडसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून, उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रासह बारावीची परीक्षा किंवा समकक्ष (१०+२ परीक्षा प्रणालीअंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एनसीव्हीटी/ एससीव्हीटीद्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची वयोमर्यादा ५ ऑगस्ट २०२४ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे दरम्यान असावी. अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत ०५ वर्षे असावे. ओबीसी उमेदवारांच्या बाबतीत ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
अधिसूचनेविरुद्ध अर्ज करणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाईल. सर्व पात्र उमेदवारांसाठी (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी) ट्रेडसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसह) दहावीच्या परीक्षेत किंवा तत्सम (१०+२ परीक्षा प्रणालीअंतर्गत) आणि आयटीआय/ट्रेड गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अर्ज शुल्क सर्व उमेदवारांसाठी १४१/- रुपये आणि अनुसूचित जाती/जमाती, अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी), महिला उमेदवारांसाठी ४१/- रुपये आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार डब्ल्यूसीआरची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी.