मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  West Bengal: मुर्शिदाबाद सरकारी रुग्णालयात २४ तासात १० नवजात अर्भकांचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेत खळबळ

West Bengal: मुर्शिदाबाद सरकारी रुग्णालयात २४ तासात १० नवजात अर्भकांचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेत खळबळ

Dec 08, 2023 03:09 PM IST

New Born Babies Death : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद सरकारी रुग्णालयात एकाच दिवशी १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने आयोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.

Murshidabad hospital
Murshidabad hospital

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्रील नांदेड सरकारी रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मुर्शिदाबाद रुग्णालयात मागील २४ तासात ९ नवजात शिशु आणि एका २ वर्षीय बाळाचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी इतक्या मुलांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, मृत्यू झालेल्या १० बाळांपैकी तीन बाळांचा जन्म मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात झाला होता. अन्य अर्भकांना गंभीर अवस्थेत अन्य रुग्णालयात येथे रेफर करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की, दोन वर्षाच्या बाळावर रुग्णालयात न्यूरोलॉजिकल उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जी मुले रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू -

रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगीपूर उप-जिल्हा रुग्णालयाच्या शिशु विभागाचे नुतनीकरणाचे काम मागील सहा आठवड्यापासून सुरू आहे. यामुळे जंगीपुर परिसरातील सर्व मुलांना बहरामपूर रुग्णालयात पाठवले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोमकल, लालबाग उप-विभागीय रुग्णालयात नवजात शिशुंना मोठ्या प्रमाणात बहरामपूरला रेफर केले जात आहे. या रुग्णालयात जेव्हा केस गंभीर बनते तेव्हा नवजात शिशुंना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात रेफर केले जाते.

हॉस्पिटल अथॉरिटीने सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल पश्चिम बंगाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. मुर्शिदाबाद रुग्णालयाने सांगितले की, मागील एका महिन्यात ३८० नवजातअर्भकांना येथे पाठवण्यात आले होते.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर