मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जमीन नावावर करण्यास पत्नीचा नकार, संतापलेल्या पतीने तिच्या शरीराचे ६ तुकडे केले आणि...

जमीन नावावर करण्यास पत्नीचा नकार, संतापलेल्या पतीने तिच्या शरीराचे ६ तुकडे केले आणि...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 17, 2024 11:34 AM IST

Man Kills Wife In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीने संपत्तीच्या वादातून पत्नीची हत्या केली.

crime
crime

West Bengal Man Kills His Wife: पश्चिम बंगालच्या परगना जिल्ह्यातील मध्यमग्राम येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ५५ वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या हत्या करून तिच्या शरीराचे ६ तुकडे केले. त्यानंतर मृतदेह एका पिशवीत टाकून कालव्यात फेकून दिले. हत्यानंतर आरोपी पतीने पत्नी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली. मात्र, आरोपीच्या मुलीला आईच्या हत्येबाबत समजले असता त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन आरोपीची चौकशी केली असता त्याने पत्नीच्या हत्येची कबूली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नूरुद्दीन मंडल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने शनिवारी मध्यमग्राम पोलिसांत त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. परंतु, आरोपीच्या मुलीने आईचे अपहरण आणि वडिलांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना आरोपीवर वेगळाच संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबूली दिली.

संपत्तीच्या वादातून संबंधित महिलेची हत्या करण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे. मृत महिलेच्या आईकडे तीन एकर जमीन आणि एक घर होते. आरोपी पत्नीकडे जमीनीचा एक तुकडा त्याच्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता, अशी माहिती आरोपीच्या मुलींनी पोलिसांना दिली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याची पत्नी बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिचा शोध सुरु केला. आरोपी त्याच्या पत्नीची निर्दयीपणे हत्या करेल, असा आम्ही कधीच विचार केला नव्हता. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी हा त्याला काहीच माहिती नसल्याचे नाटक करत होता.

सध्या पोलीस आरोपीची बरे होण्याची प्रतिक्षा करत आहे. पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. या घटनेने श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करून दिली.

WhatsApp channel

विभाग