मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Murder and Suicide: पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत समजलं; रागाच्या भरात पतीनं अख्खं कुटुंबचं संपवलं!

Murder and Suicide: पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत समजलं; रागाच्या भरात पतीनं अख्खं कुटुंबचं संपवलं!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 20, 2023 07:13 PM IST

Man Kills Wife over Immoral Relationship: पश्चिम बंगालमध्ये पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन स्वत:ही आत्महत्या केली.

 West Bengal crime
West Bengal crime

West Bengal Man suicide After killing Family: पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रविवारी एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडले. अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता पती-पत्नीसह घरातील चार जणांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, वृंदाबन कर्माकर (वय, ५२) त्याची पत्नी देबश्री कर्माकर (वय, ४०) त्याची मुलगी देबलीना (वय, १७) आणि मुलगा उत्सा (वय, ८) अशी मृतांची नावे आहेत. वृंदाबन कर्माकर कापड व्यापारी होता. रविवारी कर्माकर यांच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता कर्माकर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, इतर तीन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. वृंदाबनने आधी पत्नीची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलांना ठार केले, असे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांना मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली,जी वृंदाबनने लिहिली होती. देबश्रीची दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरु असल्याची माहिती त्याला मिळाली. यामुळे तो नैराश्यात गेला. त्यानंतर त्याने देबश्री आणि दोन मुलांची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsApp channel

विभाग