lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

Published May 16, 2024 10:59 PM IST

Lightning West Bengal : मालदा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटनांत १२ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीररित्या भाजले आहेत. मृतांमध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)
वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात गुरुवारी अंगावर वीज कोसळण्याच्या विविध ठिकाणी घडलेल्या घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण गंभीररित्या भाजले आहेत. मृतांमध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलेही आहेत. 

स्थानिक सुत्रांनुसार मृतांपैकी ३ जण जुन्या मालदा ठाण्यातील साहपूर परिसरातील आहेत. अन्य दोन जणांची घरे गाजोल परिसरातील अदीना आणि बालूपूरमध्ये आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी मालदा मेडिकल कॉलेजमध्ये आणले आहेत. पोलीस व स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  मृतांची नावे चंदन सहनी (४०), राज मृधा (१६), मनोजीत मंडल (२१), असित साहा (१९), सुमित्रा मंडल (४६), पंकज मंडल (२३), नयन रॉय (२३), प्रियंका सिंह रॉय (२०), राणा शेख (८), अतुल मंडल (६५) आणि सबरुल शेख (११) अशी आहेत. 

शेतात काम करताना गमावला जीव –

मृतांपैकी तीन जणांचे घर ओल्ड मालदा ठाण्यातील साहपूर परिसरात आहे. तर अन्य दोघांची घरे गाजोल ठाणे परिसरातील अदीना आणि रतुआ ठाणे परिसरील बालूपुर आहे. त्याचबरोबर हरिश्चंद्रपूरमधील नयन रॉय आणि प्रियंका रॉय या जोडप्याचा त्यांच्या शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. मृतांमध्ये ८ व ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अंगावर वीज कोसळल्याने फातेमा बीबी (३५) आणि दुलु मंडल (४५) जखमी झाले आहेत. त्यांचे घर एंग्रेजबाजार ठाणे परिसरात आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृत असित साहा आणि राज मृधा १० वी ११ वीच्या वर्गात शिकत होते.

मृतक मनोजीत मंडल याचे आजोबा संजीव मंडल यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी त्यांचे भाऊ शेतात काम करत होते. पावसापासून बचावासाठी ते झाडाखाली थांबले होते. यावेळी झाडावर वीज कोसळून त्यांच्या भावासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे गाजोलमधील अदीना परिसरात आंब्याच्या बागेतून घरी परतताना ११ वीतील विद्यार्थी असित साहा अंगावर वीज कोसळून ठार झाला. 

ममता बॅनर्जी यांचे ट्विट -

ममता बनर्जी यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’ वर पोस्ट केली आहे की, वज्रपातातात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याने दु:खी आहे. ज्या लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करत आहे. मालदा येथे वीज कोसळण्याच्या घटनेने मनाला वेदना होत आहे. या घटनेत जीव गमावणाऱ्यांप्रती श्रद्धांजली अर्पण करते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर