मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वेश्याव्यवसाय रॅकेटप्रकरणी भाजपा नेत्याला अटक, ६ अल्पवयीन मुलींची पोलिसांकडून सुटका

वेश्याव्यवसाय रॅकेटप्रकरणी भाजपा नेत्याला अटक, ६ अल्पवयीन मुलींची पोलिसांकडून सुटका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 23, 2024 06:01 PM IST

Wesy bengal News : पश्चिम बंगालमधील भाजप नेत्याला त्यांच्या हावडा येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींचे वेश्याव्यवसाय रॅकेट चालवताना पकडले. पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली

bjp leader Sabyasachi ghos
bjp leader Sabyasachi ghos

पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजप नेते सब्यसाची घोष यांना शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्यावर हावडा येथील एका हॉटेलात वेश्याव्यवसाय रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. घोष यांना अशावेळी अटक करण्यात आली आहे, जेव्हा संदेशखाली  प्रकरणावर भाजपने उचलून धरत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. अनेक महिलांनी टीएमसी नेते शेख शाहजहां आणि त्याच्या सहकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता भाजपवर पलटवार करताना टीएमसीने दावा केला आहे की, भाजप नेत्याकडून सेक्स रॅकेट चालवले जात आहे. 

टीएमसीने म्हटले आहे की, बंगाल पोलिसांनी या प्रॉस्टिट्यूशन रॅकेटचा भांडाफोड केला आहे. हे हावड्यात सब्यसाची घोष यांच्या हॉटेलात चालवले जात होते. टीएमसीने भाजपवर महिलांना नव्हे तर दलालांना वाचवल्याचा आरोप केला आहे.  TMC च्या ऑफिशियल एक्स हँडलवर याबाबत पोस्ट केली आहे. 

त्यात म्हटले आहे की, बंगाल भाजपचा नेता सब्यसाची घोष यांना हावडा येथील  सांकराइल येथे आपल्या हॉटेलात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय रॅकेट चालवताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली असून ६ अल्पवयीन मुलींचा सुटका केली आहे. हेच भाजप आहे, जे मुलींची नाही दलालांचे संरक्षण करते.

संदेशखाली येथील अनेक महिलांनी सत्ताधारी तृणमूलच्या अनेक नेत्यांवर लैंगिक शोषण आणि जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य शेख शहाजहान हा मुख्य गुन्हेगार असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

आता तृणमूलने भाजपाविरोधात शड्डू ठोकला आहे. भाजपा नेते सब्यसाची घोष यांना वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावरून तृणमूल काँग्रेसने भाजपावर टीकास्र डागलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग