wedding was called off after bride's family skips mutton bone marrow on menu: तेलंगना येथे नुकत्याच प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट 'बालागम' सारखीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. या घटनेची चर्चा राज्यभरात सुरू आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांना बोन मॅरो नसलेले मटण वाढल्याने वऱ्हाडी मंडळींनी संताप व्यक्त केला. ही बाब मुलाच्या वडिलांना समजल्यावर त्यांनी थेट लग्नच मोडले.
'बालागम' चित्रपटातही जेव्हा लग्नातील पाहुण्यांना मटणात बोन मॅरो नसल्याने वधू-वरांच्या धाकट्या भावात वाद होतात, त्यानंतर लग्न रद्द होते. तसाच काहीसा किस्सा उघडकीस आला आहे.
तेलंगणा येथील निजामाबाद जिल्ह्यातील वधू आणि जगतियाल जिल्ह्यातील एका दोन कुटुंबात विवाह निश्चित झाला होता. वधू वराचा साखरपुडा देखील उरकला होता. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी भव्य आणि पारंपारिक पद्धतीने लग्न करण्याचे मान्य केले. या व्यवस्थेअंतर्गत वधूच्या कुटुंबीयांनी लग्नातील पाहुण्यांसाठी मांसाहाराची व्यवस्था केली होती. मांसाहारी थाळीत मटण दिले होते.
लग्नात सर्व काही सुरळीत चालले होते. पण अचानक माशी शिंकली. जेवणामध्ये मटण वाढत असतांना बोन मॅरोचे पीस दिले जात नव्हते. बोन मॅरोचे पीस न मिळाल्याने लग्नातील पाहुणे नाराज झाले. वराच्या ताटात देखील बोन मॅरोचे पीस दिले गेले नसल्याने या गोष्टीचा वराला राग आला. ही बातमी वराच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. वराच्या कुटुंबीयांनी वधूच्या कुटुंबीयांकडे याबाबत तक्रार केली. यातून वाद वाढला. हा वाद एवढा वाढला की दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनीही दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण वर पक्ष मात्र, समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.
मटणात बोन मॅरोचे पीस न मिळणे हा त्यांचा अपमान आहे, अशी भूमिका वर पक्षाने घेतली. तर मटणात बोन मॅरोचे पीस होते असा पवित्रा वधू पक्षाने घेतला. मात्र, एकमत न झाल्याने शेवटी नाराज वर पक्षाने हे लग्नचं मोडले आणि घेऊन आलेली वरात लग्न न करताच परत घेऊन गेले. मटणात बोन मॅरो न मिळाल्यामुळे लग्न रद्द झाल्याने पोलिस देखील चक्रावून गेले. दरम्यान, या अनोख्या लग्नाची गोष्ट राज्यात वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चेचा विषय ठरली.
संबंधित बातम्या