Viral Wedding Card: सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. भारतात लोक मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा करत असतात. लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट झाला आहे. लग्नासाठी काही वेळा खास लग्नपत्रिका देखील बनवल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. ही पत्रिका पाहून अनेकांना हसू येत आहे.
या पत्रिकेत निमंत्रितांना म्हटलं आहे की, लग्नात जेवण करून जा, मात्र, एकदाच जेवा कारण ताटाची किंमत दोन हजार रुपये आहे. याशिवाय अनेक गोष्टी या लग्नपत्रिकेत गमतीशीर पद्धतीनं लिहिल्या आहेत. या पत्रिकेवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया देकहगिळ दिल्या आहेत.
व्हायरल लग्नपत्रिकेत लिहिले आहे की, "शर्माजींची मुलगी ही अभ्यासात हुशार आहे. तर गोपाळजींचा मुलगा बीटेक झाला असून तो दुकान सांभाळतो. गेल्या वर्षी दुबे जी जिथे निवृत्त झाले, त्यावेळी त्या ठिकाणी गोंधळात टाकणारे प्रवेशद्वार होते. त्याची ठिकाही हा लग्न सोहळा पार पडणार आहे, असे निमंत्रण पत्रिकेत मजेशीर भाषेत लिहिण्यात आले आहे.
लग्न पार पडलं असून यानंतर आत्या आणि मामा यांच्या वादाचा देखील प्रसंग राहणार आहे. लग्नाचा हँगओव्हर अजून संपलेला नाही. रिसेप्शनचं नाटक बघायला नक्की या जे सायंकाळी सात वाजता सुरू होईल. या साठी आम्ही रात्री ८.३० वाजेपर्यंत कार्यालयात येऊ.
रिसेप्शनमध्ये येण्याच्या गाईडलाईन्स देखील लग्न पत्रिकेत छापण्यात आल्या आहेत. लग्नात येतांना तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा, एवढा महागडा लग्न मंडप हा त्यांच्या खेळण्याचे मैदान नाही. लग्नात आल्यावर मामांजींना नक्की भेटा, नाही तर त्यांना राग येईल. लग्नात फक्त एकदाच जेवा करण प्रति प्लेट दर हा दोन हजार आहे.
हे कार्ड डॉ. अजयिता यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केलं आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर १३० हून अधिक कमेंट्स आणि अडीच हजारापेक्षा जास्त जणांनी लाईक्स दिले आहेत. त्यापैकी एकाने लिहिले की, "माझ्या मुलाचे लग्न या वर्षी जानेवारीमध्ये झाले होते, जर मला हे कार्ड आधी मिळाले असते तर मीदेखील त्याचे कार्ड असेच तयार केले असते."
संबंधित बातम्या