महाराष्ट्रात हरयाणापेक्षाही मोठा विजय हवा आहे; काय म्हणाले नरेंद्र मोदी?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्रात हरयाणापेक्षाही मोठा विजय हवा आहे; काय म्हणाले नरेंद्र मोदी?

महाराष्ट्रात हरयाणापेक्षाही मोठा विजय हवा आहे; काय म्हणाले नरेंद्र मोदी?

Oct 09, 2024 03:47 PM IST

Narendra Modi : हरयाणाच्या निवडणुकीत राज्यातील सर्व घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं हरयाणात आमचा विजय झाला. महाराष्ट्रात यापेक्षाही मोठा विजय हवा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले.

महाराष्ट्रात हरयाणापेक्षाही मोठा विजय हवा आहे; काय म्हणाले नरेंद्र मोदी?
महाराष्ट्रात हरयाणापेक्षाही मोठा विजय हवा आहे; काय म्हणाले नरेंद्र मोदी? (Reuters file)

Narendra Modi on Maharashtra Election : ‘जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा मनसुबा हरयाणाच्या जनतेनं उधळून लावला आहे. महाराष्ट्रातील मतदारही हेच करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच, ‘महाराष्ट्रात महायुतीला आणखी मोठा विजय हवा,’ अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.

मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा आणि हिंगोली येथील विविध सुविधांसह महाराष्ट्रभरात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा शुभारंभ नरेंद्र मोदी हस्ते आज झाला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी काँग्रेसवर जोरदार तोफ डागली.

'देशाच्या मनात काय आहे हे हरयाणाच्या निवडणुकीनं दाखवून दिलंय. आम्ही हरयाणात दोन टर्म पूर्ण केल्या आणि तिसऱ्यांदा निवडून आलो. तिथं जनतेची दिशाभूल करण्यात काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा गुंतली होती. दलितांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. मात्र, तिथल्या दलित समाजानं भाजपला विक्रमी पाठिंबा देत विरोधकांचे डावपेच हाणून पाडले. हरयाणातील इतर मागासवर्गीय देखील आमच्या मागे उभे राहिले. शेतकरी, तरुणांनीही आमच्यावर विश्वास दाखवला, , असा दावा मोदींनी केला.

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर मोदींनी सडकून टीका केली. 'फूट पाडा आणि राज्य करा हे काँग्रेसचं धोरण आहे. मुस्लिमांना घाबरवा आणि त्यांना व्होट बँक करून घ्या. काँग्रेस हिंदू समाजातील जातीव्यवस्थेची चर्चा करते, पण मुस्लिमांमध्येही अनेक जाती आहेत हे त्यांचा एकही नेता सांगत नाही. राजकीय फायद्यासाठी हिंदूंमध्ये भांडणं लावून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदू फुटले की त्याचा फायदा आपल्याला होईल हे काँग्रेसला माहीत आहे. त्यामुळंच ते या प्रकारचं राजकारण करतात. जिथं जिथं निवडणुका होतात, तिथं काँग्रेस हाच फॉर्म्युला वापरते, असा आरोप मोदींनी केला.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर