Wayanad By Election : वायनाडमध्ये टफ फाईट..! प्रियंका गांधी आघाडीवर की पिछाडीवर? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wayanad By Election : वायनाडमध्ये टफ फाईट..! प्रियंका गांधी आघाडीवर की पिछाडीवर? जाणून घ्या

Wayanad By Election : वायनाडमध्ये टफ फाईट..! प्रियंका गांधी आघाडीवर की पिछाडीवर? जाणून घ्या

Nov 23, 2024 12:37 PM IST

Wayanad By Election Result 2024: वायनाडमध्ये काँग्रेस उमेदवार प्रियंका गांधी आघाडीवर असून भाजप उमेदवार नव्या हरिदास पिछाडीवर पडल्या आहेत. आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रियंका जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे.

 प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

Wayanad By Election Result 2024 : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी मोठ्या विजयाच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार प्रियंका गांधी एक लाख मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून एक लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहे. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनप्रियंका गांधी यांनी घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार प्रियंका गांधी वाड्रा एक लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत आणि दूसऱ्या नंबरवरती भाकपाचे नेते सत्यन मोखेरी आहेत. भाजप उमेदवार नव्या हरिदास तिसऱ्या नंबरवरती आहेत. भाकपा नेते सत्यन मोखेरी यांना जवळपास ५० हजार तर नव्या हरिदास यांना जवळपास २८ हजार मते मिळाली आहेत.

पलक्कड पोटनिवडणुकीतही तिरंगी मुकाबला -

त्याचबरोबर पलक्कड़ विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होताना दिसत आहे. सुरुवातीला भाजप उमेदवार सी कृष्णकुमार यांनी आघाडी घेतली होती, मात्र आता ते पिछाडीवर पडले आहेत. काँग्रेस उमेदवार राहुल ममकूटथिल आघाडीवर आहेत. काँग्रेसचा हात सोडून माकपा समर्थित अपक्ष उमेदवार डॉ. पी सरीन तिसऱ्या नंबरवर आहेत.

चेलाक्कारा विधानसभा मतदारसंघात सीपीआय (एम) उमेदवार यूआर प्रदीप ४,४९८मतांनी आघाडीवर आहेत.

वायनाडमध्य़े प्रियंका गांधी यांना मोठी आघाडी -

प्रियंका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यामध्ये वायनाड जिल्ह्यातील मनंतावाडी (राखीव),सुल्तान बथेरी (राखीव), कलपेट्टा, कोझिकोड जिल्ह्तील तिरुवमबाडी तसेच मलप्पुरम जिल्ह्यातील निलांबूर, ईरानद आणि वंडूर जागांचा समावेश आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर वायनाडची जागा रिक्त होती. लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतूनही विजयी झाल्य़ानंतर राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडली होती. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावली गेली.

 

प्रियंका कि नव्या हरिदास,वायनाडमधून कोण?

वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रियंका गांधी पहिल्यांच या निवडणुकीच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात पदार्पण करत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वातील डावी आघाडी (एलडीएफ) ने सत्यन मोकेरी यांना तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी (आरजेडी) ने नव्या हरिदास यांना मैदानात उतरवले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर