Wayanad landslides : मराठमोळ्या मेजर सीता शेळकेनं धो-धो कोसळणाऱ्या पावसात वायनाडमध्ये उभारला १९० फूट लांब लोखंडी पूल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wayanad landslides : मराठमोळ्या मेजर सीता शेळकेनं धो-धो कोसळणाऱ्या पावसात वायनाडमध्ये उभारला १९० फूट लांब लोखंडी पूल

Wayanad landslides : मराठमोळ्या मेजर सीता शेळकेनं धो-धो कोसळणाऱ्या पावसात वायनाडमध्ये उभारला १९० फूट लांब लोखंडी पूल

Aug 02, 2024 04:24 PM IST

Wayanadlandslides : भारतीय लष्कराने वायनाडमधील भूस्खलन झालेल्या चूरलमाला आणि मुंडाकाई यांना जोडणाऱ्या बेली ब्रीजचे विक्रमी वेळेत निर्माण केले आहे.

वायनाडमध्ये उभारलेला बेली ब्रीज
वायनाडमध्ये उभारलेला बेली ब्रीज

Wayanad landslides: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो मदत व बचाव कार्यात महिलांच्या योगदानावर शंका घेणाऱ्यांसाठी प्रत्युत्तर आहे. व्हायरल फोटोमध्ये मराठमोळी आर्मी मेजर सीता शेळके या लष्कराने बांधलेल्या बेली ब्रिजवर उभ्या आहेत. शेळके या महिला आर्मी अभियंता असून त्यांच्या मार्गदर्शनात मुंडक्काई येथे भूस्खलनानंतर ब्रीज बांधण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, मेजर शेळके यांच्या नेतृत्वाची सर्वांना ओळख होण्याबरोबरच बचाव कार्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिकाही अधोरेखित झाली आहे.

भारतीय लष्कराने वायनाडमध्ये कमाल केली आहे. भूस्‍खलनानंतर वायनाडमध्ये लष्कराने केलेल्या कामाची संपूर्ण देशभर चर्चा होत आहे. वायनाडच्या नैसर्गिक आपत्तीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता लष्कराने उध्वस्त झालेला पूल पुन्हा जोडून लोकांना मोठा दिलासा दिला आहे. या मोहिमेत सीता शेळके यांचे मोठे योगदान राहिले आहे.

भारतीय लष्कराने गुरुवारी वायनाडमधील भूस्खलन झालेल्या चूरलमाला आणि मुंडाकाई यांना जोडणाऱ्या बेली ब्रीजचे निर्माण केले. १९० फूट लांब या पुलाचे निर्माण मदत व बचाव कार्याला प्रोत्साहन म्हणून केले आहे. याची वजन क्षमता २४ टन आहे.

या पुलाचे निर्माणकार्य ३१ जुलै रोजी रात्री ९ वाजता सुरू केले होते आणि १६ तासांच्या आतहे काम पूर्ण करण्यात आले. हा पूल नदीवर बनवण्यात आला आहे. बेली ब्रीज एक तात्पुरता पूल असतो जो पूर्व-निर्मित स्टील पॅनलने बनवला जातो. हे पॅनल जोडून तत्काळ ब्रीज बनवला जातो.

विक्रमी वेळेत पूल बनवल्यामुळे जवानांचे कौतुक करताना संरक्षण प्रवक्ते त्रिवेन्द्रम यांनी एक्सवर लिहिले की, भारतीय लष्कराच्या मद्रास इंजीनियर्स ग्रुपच्या मेजर सीता शेळके व त्यांच्या टीमचे अभिनदंन. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत वायनाडमध्ये केवळ १६ तासात २४ टन वजनी क्षमतेचा १९० फूट लांब पूल बनवला. पूल बनवण्यासाठी ३१ जुलै रोजी रात्री ९ वाजता सुरूवात केली गेली व १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पुलाच् निर्माणकार्य पुर्ण झाले.

लष्कराने पुलाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पुल बनवण्यासाठी लागणारे साहित्य दिल्ली व बेंगळुरू येथून चूरलमाला येथे आणण्यात आले होते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की,  कन्नूर विमानतळावरून ही सामग्री १७ ट्रकांमध्ये भरून वायनाडला नेण्यात आली.

बेली ब्रीज म्हणजे काय?

बेली ब्रीज एक अस्थायी पूल असतो, जो पूर्व-निर्मित स्टील पॅनल्सनी बनवला जातो. बेली ब्रीज एक प्रकारचा पोर्टेबल, प्री-फॅब्रिकेटेड, ट्रस ब्रीज आहे. हे तंत्रज्ञान १९४०-१९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धात सैन्यासाठी इंग्रजांनी विकसित केले होते. बेली ब्रीज जोडण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची किंवा अवजड साधनांची गरज नसते. लाकून व स्टीलचे सुटे भाग ट्रकमध्ये लादून नेले जाऊ शकतात. त्याचबरोबर क्रेनचा वापर न करता हाताने उचलून नेते येतात. हे पुल टँक घेऊन जाण्यासाठी मजबूत असतात. बेली ब्रीजचा वापर सिविल इंजीनिअरिंग प्रकल्प आणि वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात क्रॉसिंग प्रदान करण्यासाठी केला जातो.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर