Wayanad landslides: मृतांचा आकडा १२३ वर; केरळमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, लष्कर व NDRF कडून बचावकार्य युद्धपातळीवर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wayanad landslides: मृतांचा आकडा १२३ वर; केरळमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, लष्कर व NDRF कडून बचावकार्य युद्धपातळीवर

Wayanad landslides: मृतांचा आकडा १२३ वर; केरळमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, लष्कर व NDRF कडून बचावकार्य युद्धपातळीवर

Jul 31, 2024 12:03 AM IST

Wayanad landslides : वायनाड भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत आणि नदी नाल्यांना पूर आला आहे, त्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.

वायनाड भूस्खलना मृतांचा आकडा १२३ वर
वायनाड भूस्खलना मृतांचा आकडा १२३ वर (PTI)

केरळमधील वायनाड जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे मोठी जिवीतहानी झाली आहे. मुसळधार  पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमधील मेपाड्डी, मुंडक्कल आणि चूरलमाला परिसरामधील अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा मंगळवारी सायंकाळी १२३ वर पोहोचला. 

भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत आणि भाग पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वायनाडमधील बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी आणि पुढील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

केरळ भूस्खलन दुर्घटनेबाबत  १० मुद्दे -

  1. तिरुवनंतपुरम येथे पत्रकार परिषदेत विजयन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले.
  2. ९३ मृतदेह सापडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने १२३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर १२८  जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  3. ढिगाऱ्यात मृतदेहांव्यतिरिक्त शरीराचे अनेक अवयवही सापडले आहेत. या आपत्तीत प्राण गमावलेल्यांमध्ये लहान मुलांसह रात्रीच्या वेळी  झोपलेल्या मुलांचाही समावेश आहे. अनेक जण जमिनीखाली गाडले गेले आहेत. पुराच्या पाण्याने अनेक जण वाहून गेले. वायनाडच्या शेजारील मलप्पुरम जिल्ह्यातील पोथुकल्लू येथील चालियार नदीतून सोळा मृतदेह सापडले असून शरीराचे अवयवही सापडले आहेत, असे विजयन यांनी सांगितले.
  4. केरळने पाहिलेली ही सर्वात गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचे ते म्हणाले. ३००० हून अधिक लोकांना ४५ छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे.
  5. लोक जमिनीखाली अडकलेले आणि पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. बचावकार्य सुरू ठेवण्यासाठी सर्व संभाव्य संसाधने आणि पद्धतींचा वापर केला जाईल, असे विजयन यांनी सांगितले.
  6. लष्कर, नौदल आणि एनडीआरएफ बचावकार्यात गुंतले आहेत. केरळ सरकारच्या विनंतीनंतर कन्नूर येथील एझिमाला नेव्हल अॅकॅडमीचे नौदलाचे रिव्हर क्रॉसिंग पथक बचावकार्यात सहभागी होणार आहे.
  7. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी बुधवारी वायनाडच्या दौऱ्यावर जाऊ शकतात.
  8. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने वायनाडसाठी रेड अलर्ट जारी केला असून, या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  9. आयएमडीने आठ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर पथनमथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  10. उत्तर केरळमधील पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांसह मध्य केरळमधील इडुक्की आणि त्रिशूर मध्ये मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर