केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाने असे रौद्ररुप दाखवले आहे की, वायनाडमध्ये सर्वत्र विध्वंस दिसत आहे. या आपत्तीत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. वायनाडमध्ये कुठे पाहाल तिकडे जमीनदोस्त झालेल्या इमारती, पडलेल्या भिंती, मोठ-मोठी दगडे या आपत्तीची भीषणता दाखवतात. एकीकडे केरळच्या लोकांच्या वेदनादायी कहाण्या समोर येत असताना दुसरीकडे याला एका योगायोग म्हणाल की, शालेय मुलीने लिहिलेल्या निबंधात केरळमध्ये अशाच आपत्तीचे वर्णन आहे. वायनाड दुर्घटना मुलीच्या कहाणीशी मिळतीजुळती आहे. १४ वर्षीय मुलगी लाया हिने स्कूल मॅगझिनसाठी जी कथा लिहिली त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी केली आहे. मुलीची ही कहाणी डिजिटल मॅगझिनमध्ये छापली असून एक वर्षानंतर ही कथा सत्य ठरली आहे.
राज्य सरकारच्या केरळ इंफ्रास्ट्रक्चर अँड टेक्नोलॉजी फॉर एजुकेशन (KITE)प्रकल्पाच्या अंतर्गत लिटिलKITEs योजनेच्या माध्यमातून शाळेत ‘वेल्लारम कल्लुकल'नावाच्या मासिकाचे उद्घाटन करण्यात आले. ‘अग्रहतिंते दुरानुभवम' (इच्छेची आपत्ती) नावाच्या कहाणीत दोन मुली आलमक्रूथा आणि अनास्वरा शाळा सुटल्यानंतर आपल्या गावात नदीकिनारी फेरफटका मारण्यासाठी जातात. नदीकिनाऱ्यावरून जाताना त्या एका धबधब्याजवळ पोहोचतात. जेव्हा त्या मुली धबधब्याचे सुंदर रुप पाहात असतात, तेव्हा तेथे एक चिमणी येते. ही चिमणी अन्य पक्ष्यांहून वेगळी आहे. चिमणी त्या मुलांना म्हणते मुलांनो येथून लवकर पळून जावा, कारण येथे मोठा धोका येत आहे. तुम्हाला सुरक्षित रहायचे असेल तर येथून पळून जावा. हा इशारा देल्यानंतर चिमणी उडून जाते.
कथा लिहिणाऱ्या यामुलीचे नाव लाया असं असून तीआठवीत शिकते. गेल्या वर्षी तिने शाळेत एका लघुकथा लिहिली होती. लायाची ही कथा गेल्या वर्षी स्कूल मॅगझिनमध्येही प्रसिद्ध झाली होती.हीकथा धबधब्यात बुडणाऱ्या मुलीची होती. तिचा बुडून मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर ती पक्ष्याच्या रूपाने गावात परतते.
चिमणीचा इशारा ऐकल्यानंतर मुले गावातून पळू लागतात.मागे वळून डोंगराकडे पाहताना त्यांना डोंगरावरून खाली पावसाचे पाणी वेगात येताना दिसते. त्याचबरोबर त्यांना दिसते की, चिमणी एका सुंदर मुलीच्या रुपात बदलते. ती त्यांना केवळ इशारा देण्यासाठी आलेली असते. ही कथा व वायनाडमधील दुर्घटना मिळतीजुळती आहे.
केरळचे एडीजीपी एमआर अजित कुमार यांनी सांगितले की,अजूनही ३००लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ३०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. मात्र,महसूल विभागाकडून अद्याप ही माहिती संकलित केली जात आहे. एक-दोन दिवसांत अंतिम चित्र समोर येईल, असे कुमार यांनी सांगितले.
१९० फूट लांबीचा बेली ब्रिज पूर्ण झाल्याने सकाळपासून सुरू झालेल्या ४० पथकांच्या शोध व बचाव कार्याला वेग आला. या ब्रीजमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या मुंडक्कई आणि चोरलमाळा पाड्यांमध्ये खोदाई यंत्रे आणि रुग्णवाहिकांसह अवजड यंत्रसामुग्रीची वाहतूक करणे शक्य होणार आहे.
संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, श्वान पथकाच्या तुकड्यांनी सकाळी ७ वाजता शोधमोहीम सुरू केली. स्थानिक हितसंबंधांच्या आधारे शोधमोहिमेचे नियोजन करण्यात आले.
संबंधित बातम्या