मुस्लिम व्यक्ती सनातनी हिंदू बनल्यास प्रति महिना ३००० रुपये देणार; शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांची महाकुंभात घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुस्लिम व्यक्ती सनातनी हिंदू बनल्यास प्रति महिना ३००० रुपये देणार; शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांची महाकुंभात घोषणा

मुस्लिम व्यक्ती सनातनी हिंदू बनल्यास प्रति महिना ३००० रुपये देणार; शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांची महाकुंभात घोषणा

Published Feb 11, 2025 05:59 PM IST

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी आणि जितेंद्र नारायण त्यागी यांनी मुस्लिमांना सनातन धर्म स्वीकारण्याचे खुले आवाहन केले आहे. हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्या प्रत्येक मुस्लिमाला दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी

धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी बनलेले शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्षांनी आता मुस्लिमांना घरवापसी करण्याचे खुले आवाहन केले आहे. इतकंच नाही तर इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मंगळवारी त्यांनी महाकुंभात पोहोचून संगमस्नान केले. इस्लाम धर्मातून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी ही मदत केली जाईल, असे ते म्हणाले.

जितेंद्र नारायण त्यागी यांनी सांगितले की, आज संगम स्नान केल्यानंतर त्यांना खूप आनंद होत आहे. मी या पवित्र भूमीवरील देशभरातील मुस्लिमांना विनंती करतो की, त्यांनी सनातन धर्मात परतण्याच्या संदर्भात विचार करावा. मी माझ्या मित्रांच्या माध्यमातून एक संस्था तयार करत आहे,  आमच्या संस्थेच्या माध्यमातून सनातन धर्मात परतलेल्या मुस्लिम कुटुंबांना दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील.  सनातन धर्मात पूर्णपणे स्थायिक होईपर्यंत ते तीन हजार रुपये देतील. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनाही व्यवसायात मदत केली जाईल.

त्यांनी म्हटले की, मूलतत्त्ववादी आणि जिहादी मानसिकतेतून तुम्हाला बाहेर पडावे लागेल. आपल्या आनंदाने सनातन धर्माकडे परत या. सनातन धर्म तुमचे स्वागत करतो. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी तीन वर्षांपूर्वी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारला होता. धर्म बदलल्यानंतर त्यांनी आपले नावही वसीम रिझवी वरून जितेंद्र नारायण सिंह त्यागी असे बदलले. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांचे सनातन धर्मात धर्मांतर करून त्यांना नवे नाव दिले होते.

धर्मांतर केल्यानंतर रिझवी यांनी सनातन धर्म जगातील सर्वात जुना धर्म असल्याचे सांगितले. वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांची शुद्धी करण्यात आली होती. हवन-यज्ञही करण्यात आला होता.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर