Waqf Amendment Bill : वक्फ संशोधन विधेयकाला JPC ची मंजुरी, समितीकडून १४ बदल; विरोधकांच्या सूचना फेटाळल्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Waqf Amendment Bill : वक्फ संशोधन विधेयकाला JPC ची मंजुरी, समितीकडून १४ बदल; विरोधकांच्या सूचना फेटाळल्या

Waqf Amendment Bill : वक्फ संशोधन विधेयकाला JPC ची मंजुरी, समितीकडून १४ बदल; विरोधकांच्या सूचना फेटाळल्या

Jan 27, 2025 03:39 PM IST

Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मंजुरी दिली आहे. त्यात १४ बदल करण्यात आले आहेत. विरोधी पक्षाकडून काही सूचना करण्यात आल्या, पण त्या स्वीकारण्यात आल्या नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात मांडला जाणार आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयक
वक्फ दुरुस्ती विधेयक

Waqf amendment bill JPC : वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मंजुरी दिली आहे. त्यात १४ बदल करण्यात आले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते, त्यापैकी अनेक बदल विरोधी खासदारांनीही मांडले होते, परंतु प्रस्तावित बदल मतदानाद्वारे विरोधकांचे प्रस्ताव फेटाळून लावले.

वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी भाजपप्रणित एनडीए सदस्यांनी सुचविलेल्या सर्व सुधारणा मान्य केल्या आणि विरोधी सदस्यांनी केलेल्या सर्व सुधारणा फेटाळून लावल्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले की, समितीने स्वीकारलेल्या सुधारणांमुळे कायदा अधिक चांगला आणि प्रभावी होईल.

विरोधकांचे समितीच्या कार्यपद्धतीवर आरोप -

विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीच्या कामकाजावर टीका केली आणि पाल यांच्यावर लोकशाही प्रक्रियेला कमकुवत केल्याचा आरोप केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही एक दिखाऊ बैठक होती. आमचं ऐकलंही गेलं नाही. पाल यांनी हुकूमशाही पद्धतीने काम केले आहे. दुसरीकडे पाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि संपूर्ण प्रक्रिया लोकशाही होती आणि बहुमताने निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

४४ प्रस्तावांपैकी १४ बदलांना मंजुरी -

समितीसमोर एकूण ४४ बदल सादर करण्यात आले, मात्र केवळ १४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पाल म्हणाले की, विरोधी सदस्यांनी विधेयकाच्या सर्व ४४ कलमांमध्ये शेकडो दुरुस्त्या प्रस्तावित केल्या होत्या परंतु त्या मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या. विद्यमान वक्फ मालमत्तांचा वापर धार्मिक कारणांसाठी केला जात असेल तर विद्यमान कायद्यातील 'वक्फ बाय युजर'च्या आधारे त्यांना आव्हान देता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण दुरुस्ती समितीने प्रस्तावित केली आहे.

भाजपाच्या सर्वा १० दुरुस्ती प्रस्तावांना मंजुरी -

या बैठकीत भाजपच्या खासदारांनी १० दुरुस्त्या मांडल्या आणि सर्व सुधारणांना मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी विरोधकांनी अनेक सुधारणा मांडल्या, पण मतदानानंतर त्या सर्व फेटाळण्यात आल्या. विरोधकांनी मांडलेल्या सर्व सुधारणा १०-१६ मतांनी फेटाळण्यात आल्या. भाजपने मांडलेल्या सर्व सुधारणा १६-१० मतांनी मान्य करण्यात आल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर