Viral news : अमेरिकेतील कॅन्सस शहरात एका रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक उघडकीस आली आहे. येथे काम करणाऱ्या एका वेटरचे किळसवाने कृत्य उघडकीस आल्यावर या हॉटेलमध्ये येणारे नागरिक आजारी पडू लागले आहे. २१ वर्षीय जेस क्रिस्टियन हॅन्सन या वेटरने कबूल केले की तो हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या जेवणात प्रायव्हेट पार्टला घासायचा. याशिवाय त्यात लघवी करायाचा. हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाऊस हॉटेलमध्ये काम करत असलेल्या या वेटरच्या या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे.
हा घाणेरडा प्रकार वेटरने तब्बल २० वेळा केला असल्याचे कबूल केले आहे. वेटरने सांगितले की डेटिंग ॲप्स आणि फेटिश वेबसाइटवरील त्याचे मित्र त्याला असे करण्यास सांगत होते. वास्तविक, पोलिसांनी एका वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओचे थंबनेल पाहिले होते. Bandalizer नावाच्या युजरने हा व्हिडिओ वेबसाईटवर पोस्ट केला होता.
व्हिडिओमध्ये एक वेटर रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवर त्याचे प्रायव्हेट पार्ट घासताना दिसत आहे. याशिवाय त्याने जेवणात लघवी केली. त्याने अन्नपदार्थ पायाने तुडवले आणि नंतर ते लोकांना दिले. या व्हिडीओचे टायटल सुद्धा सारखेच होते. 'पिसिंग इन द सॉस', पिसिंग इन द रेस्टॉरंट फूड. एफबीआयने हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रथम हॅन्सनचा फोन नंबर काढला आणि नंतर त्याचा माग काढला. तपासात तो हेअरफोर्ट हाऊस हॉटेलमध्ये काम करत असल्याचे आढळले. रेस्टॉरंटच्या पार्किंग एरियात त्याच्या नावाचे एक रजिस्टरही तपास अधिकाऱ्यांना सापडले.
पोलिसांनी रेस्टॉरंटच्या प्रमुखाशी संपर्क साधला असता त्यांनी हे जेवण त्यांच्याच रेस्टॉरंटचे असल्याचे सांगितले. यानंतर हॅन्सनला तपास अधिकाऱ्यांनी बोलावले. त्यावेळी तो हॉटेलच्या किचनमध्ये काम करत होता. पोलिसांनी हॅन्सनचे शूज हे आधीच्या तीन व्हिडिओंमध्ये घातलेले शूज असल्याचे ओळखले. तपास अधिकाऱ्यांनी त्याला तो करत असलेल्या घाणेरड्या कामाबद्दल विचारले. यानंतर हॅन्सनने त्याच्या कृत्याची कबुली दिली. हॅन्सन म्हणाले ग्राइंडर, स्निफी सारखी ॲप्स पण लोक त्याला असे घाणेरडे कृत्य करण्यासाठी उकसवत होते. त्यांच्या सांगण्यावरुन तो जेवणात लघवी करायचा. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वेटरने असेही सांगितले की तो रेस्टॉरंटमध्ये हस्तमैथुन करायचा. पण त्याने कधीही अन्नात त्याचे वीर्य टाकले नाही. त्याला वेटर म्हणून काम करणे आवडत नसल्याने त्याने हे घाणेरडे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. मात्र, घाणेरडे काम केल्याने त्याला काम आवडू लागले. ही बाब त्याच रेस्टॉरंटच्या ग्राहकांना समजल्यावर ते या हॉटेलवर नाराज झाले आहे. हॅन्सनला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅन्सनला १३ महिने तुरुंगवास आणि १ लाख डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे. तर १४० जणांनी कबूल केले आहे की तो जेव्हा असे कृत्य करत होता तेव्हा त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण केले होते.