Viral Video: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूकीत भाजप आणि एनडीएने तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तर या निवडणूकीत अनेक भाजप उमेदवारांचा पराभव देखील झाला आहे. अशाच एका भाजप उमेदवाराच्या पराभवाचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकाने बकऱ्याच्या डोक्यावर भाजप उमेदवाराचा फोटो लावून त्याचा बळी दिला. हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, 'भर दिवसा हा प्रकार घडला असून बकाऱ्याच्या डोक्यावर भाजपचे पराभूत उमेदवार अन्नामलाई यांचा फोटो होता.
भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाची आघाडी असलेल्या एनडीने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. असे असले तरी भाजपच्या अनेक उमेदवारांचा पराभव देखील झाला आहे. भारतीय जनता पक्षाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये काही लोक सार्वजनिक ठिकाणी बकऱ्याचा डोक्यावर पराभूत भाजप उमेदवाराचा फोटो लावून बकऱ्याचा गळा निर्घृणपणे कापताना दिसत आहेत. एवढेच नाही तर बकरीचा मृतदेह रस्त्याच्या पलीकडे ओढून फेकून देतांना देखील दिसत आहे. भाजप नेत्याचा फोटो शेळीच्या चेहऱ्यावर लावून विरोधी पक्ष आघाडीत समाविष्ट असलेल्या DMK समर्थकांनी हे घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजपचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, 'अन्नमलाई यांचा फोटो लावलेला एक बकऱ्याचा काही नागरिकांनी बळी दिला. अण्णामलाई यांच्या राजकीय विरोधकांनी तमिळनाडूत द्रमुकचा 'विजय' असाच साजरा केला.' ही घटना म्हणजे असंस्कृतपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'सनातनविरोधी भारत आघाडी सत्तेत आल्यास हिंदूंना अशा प्रकारे मारतील', असे त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओत लिहिले आहे.
मालवीय यांनी पुढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की २०१९ पेक्षा आता होणारा विरोध हा भयंकर आहे. आताची काँग्रेस ही नवी मुस्लिम लीग आहे. जोपर्यंत ते SC/ST/OBCS साठी नवे आरक्षण येत नाही आणि ते मुस्लिमांकडून काढून घेतले जाणार नाही. तो पर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत, असे मालवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात द्रमुकने २२ जागा जिंकल्या आहेत. तर राज्यात काँग्रेसला ९ जागा मिळाल्या आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही आणि प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांना डीएमके नेते गणपति राजकुमार पी यांनी कोईम्बतूर मतदारसंघातून पराभूत केले आहे. भारतातील आघाडीच्या पक्षांनी राज्यात एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. त्याच वेळी, ५४३ पैकी एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी आघाडी भारताला २३४ जागा मिळाल्या.
संबंधित बातम्या