Russia Presidential Election : रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार! भरघोस मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक-vladimir putin won russia presidential election fifth time in row with nearly 88 pc votes ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Russia Presidential Election : रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार! भरघोस मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

Russia Presidential Election : रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार! भरघोस मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

Mar 18, 2024 08:40 AM IST

Russia Presidential Election : रशियाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवला आहे. तब्बल ८८ टक्के मते मिळवून ते पुन्हा एकदा आता राष्ट्राध्यक्ष म्हणून रशियाची धुरा सांभाळणार आहे. ते १९९९ पासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळात आहेत.

रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार
रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार (via REUTERS)

Vladimir Putin Won Russia Presidential Election: जगात सध्या अनेक देशांच्या निवडणुका सुरू आहेत. भारतात मे महिन्यात लोकसभा निवडणुका आहेत. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहेत. तर सध्या यूक्रेन युद्धात गुंतला असलेल्या रशियात अध्यक्षीय पदाची निवडणूक पार पडली असून यात पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन यांनी निर्विवाद वर्चस्व मीवळले आहे. पुतीन यांनी तब्बल ८८ टक्के मते मिळवत पुन्हा एकदा ते सलग पाचव्यांदा राष्ट्रपती होणार आहेत.

Rahul Gandhi : भाजपमध्ये जाण्यापूर्वी सोनिया गांधीसमोर ढसाढसा रडणारा 'तो' वरिष्ठ नेता कोण?

रशियात गेल्या तीन दिवसांपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू होती. शुक्रवार पासून या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागून होते. दरम्यान, पुतीन पुन्हा एकदा निवडून आले असून ते आता पाचव्यांदा राष्ट्रपती होणार आहे. रशियाच्या निवडणूक निकालाबाबत वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिले असून व्लादिमीर पुतिन यांनी ८८ टक्के मते या अध्यक्षीय निवडणुकीत मिळवले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेली तीन दिवसीय निवडणूक अत्यंत नियंत्रित वातावरणात संपली. यावेळी, लोकांना युक्रेनवरील हल्ल्याबद्दल पुतिन यांच्यावर टीका करण्याची परवानगी नव्हती. पुतीन यांचे राजकीय शत्रू अलेक्सी नॅव्हल्नी यांचा गेल्या महिन्यात तुरुंगात मृत्यू झाला असून पुतीन यांचे इतर विरोधक एकतर तुरुंगात किंवा अज्ञातवासात आहेत.

Maharashtra Weather Update : विदर्भात गारपीटीचा इशारा! काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

पुतिन यांच्यासमोर तीन उमेदवार होते. पुतिन यांनी दावा केला आहे की ते युक्रेनविरुद्धच्या युद्धात आघाडीवर आहेत. मात्र रविवारी सकाळी रशियात झालेल्या युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याने रशियाचा फोलपणा उघड केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, तब्बल ३५ ड्रोनने रशियावर हल्ला केला. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही.

सर्वाधिक काळ राहिलेले राष्ट्राध्यक्ष; जोसेफ स्टालिन यांचा रेकॉर्ड मोडला

व्लादिमीर पुतिन हे सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिले आहेत. ते १९९९ पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. बोरिस येल्तसिन यांच्या नंतर ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदानाचा हक्क बजावला. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्लादिमीर पुतिन यांनी पहिले मतदान करत त्यांचा हक्क बजावला.