who is Vivek Ramaswamy : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. पुढील वर्षी २० जानेवारी रोजी ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पण, त्याआधी डोनाल्ड ट्रम्प आपले मंत्रिमंडळ तयार करण्यात सध्या व्यस्त आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक भारतीयांना त्यांच्या मंत्रीमंडळात महत्वाचे स्थान दिले आहेत. यात भारतीय-अमेरिकन विवेक रामास्वामी यांच्यावर मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांचा सोबत ते गव्हर्नमेंट इफिशियन्सी (DOGE) विभागाचे प्रमुखपद सांभाळणार आहेत.
विवेक रामास्वामी हे भारतीय वंशाचे रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन नेते आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दावा केला होता. मात्र, या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली. ३८ वर्षीय रामास्वामी यांचा जन्म १९८५ ओहिया येथे झाला आहे. त्याचे आई-वडील भारतातून स्थलांतरित होते. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्राची पदवी मिळवली आणि त्यानंतर येल लॉ स्कूलमध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.
रामास्वामी हेज फंड गुंतवणूकदार म्हणून काम करत होते. त्यांनी येलमधून पदवी प्राप्त करण्यापूर्वी अनेक दशलक्ष डॉलर्स कमावले होते. २०१४ मध्ये त्यांनी स्वतःची बायोटेक कंपनी, रॉईवंट सायन्सेस (ROIV.O) या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे विकसित न झालेल्या औषधांसाठी मोठ्या कंपन्यांकडून पेटंट विकत घेतले. त्यांनी २०२१ मध्ये या कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. २०२२ मध्ये, रामास्वामी यांनी स्ट्राइव्ह ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली. फेब्रुवारी २०२३ मध्ये, रामास्वामी यांनी २०२४ च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नामांकनासाठी आपली उमेदवारी जाहीर केली. नंतर, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आल्याने रामास्वामी यांनी त्यांच्या साठी निवडणुकीतून माघार घेत ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला.
रामास्वामी यांचे वडील व्ही.जी. रामास्वामी मूळचे केरळ येथील पलक्कड येथील आहेत. केरळमधील स्थानिक महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांचे वडील व्ही.जी. रामास्वामी ओहायोच्या इव्हनडेल येथील जनरल इलेक्ट्रिक प्लांट येथे काम सुरू केले. तर विवेक यांची आई सिनसिनाटीमध्ये मानसोपचारतज्ज्ञ होत्या. तर रामास्वामी यांच्या पत्नी अपूर्व तिवारी या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टर आहेत.
विवेक रामास्वामी हे बायोटेक व्यवसायात अमेरिकेत प्रसिद्ध उद्योजन आहेत. रामास्वामी औषधे विकसित करण्यासाठी बायोटेक कंपनी रोइव्हंट सायन्सेस चालवतात. २०१६ मध्ये त्यांनी Myovant Sciences ही सर्वात मोठी बायोटेक्नॉलॉजी कंपनी स्थापन केली. एप्रिलमध्ये कंपनी स्थापन केल्यानंतर, त्यांनी प्रोस्टेट कर्करोगावरील औषध आणि महिला वंध्यत्वाच्या औषधासाठी टाकेडा फार्मास्युटिकल्सशी करार केला. रामास्वामी हे बायोफार्मा स्पेसमधील इतर अनेक कंपन्यांचे संस्थापक देखील आहेत, ज्यात मायोव्हंट सायन्सेस, युरोव्हंट सायन्सेस, एंजिवेंट थेरप्युटिक्स, अल्टाव्हंट सायन्सेस आणि स्पिरोव्हंट सायन्सेस यांचा समावेश आहे. ३७ वर्षीय रामास्वामी यांनी अल्पावधीतच बायोटेक क्षेत्रात स्वत:चे नाव कमावले आहे. २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाच्या मुखपृष्ठावर रामस्वामी झळकले होते. फोर्ब्स मासिकानुसार २०१४ मध्ये ३० वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजकांमध्ये विवेक रामास्वामी हे ३० व्या क्रमांकावर होते. तर २०१६ मध्ये, ते ४० वर्षाखालील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणून २४ व्या स्थानावर होते.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासकीय कार्यक्षमता विभागाचे प्रमुख राहणार आहेत. मस्क यांच्यासोबत भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे देखील या विभागाचे प्रमुख राहणार आहेत. हे दोघे मिळून डीओजीई विभागाचे नेतृत्व करतील