मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं धरलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं धरलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

The Quint HT Marathi
May 15, 2024 07:00 PM IST

Fact Check : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेतील एक व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहे. काय आहे हा व्हिडिओ? पाहा!

Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं पकडलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं पकडलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Fact Check : नोबेल पारितोषिक विजेते प्रख्यात कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वीकारत असतानाचा एका फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फोटो शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हा व्हिडिओ कोणी शेअर केला?

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. पक्षाच्या खासदार सागरिका घोष यांनीही पंतप्रधान मोदी हे रवींद्रनाथांचा फोटो स्वीकारत असल्याचा फोटो शेअर केला आहे. यात रवींद्रनाथांची प्रतिमा उलटी दिसत आहे. 

(सोशल मीडियावरील केल्या गेलेल्या विविध दाव्यांच्या लिंक तुम्ही इथं आणि इथं पाहू शकता.)

हे खरं आहे का?: नाही, व्हिडिओ क्रॉप केल्यामुळं दिशाभूल करणारी दृश्ये दिसत आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास हे लक्षात येतं की पंतप्रधान मोदी यांना रवींद्रनाथांचा फोटो देणाऱ्यानंच तो उलटा दिला होता. बाजूला उभ्या असलेल्या एका नेत्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यानं पंतप्रधानांना तसं सांगितलं. त्यानंतर चुकीची दुरुस्ती करून तातडीनं फोटो सरळ केला गेला. 

या संदर्भातील स्क्रीनशॉट या घटनेचा विपर्यास करणारा आहे. 

आम्हाला सत्य कसे कळले?

आम्ही पंतप्रधान मोदींच्या व्हेरिफाइड यूट्यूब चॅनेलवर पश्चिम बंगालमधील त्यांच्या नुकत्याच झालेल्या सभांची दृश्ये पाहण्यासाठी गेलो होतो. तिथं आम्हाला पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालच्या बॅरकपूर इथं केलेल्या भाषणाचा व्हिडिओ दिसला. तो व्हिडिओ १३ मे रोजी लाइव्ह स्ट्रीम करण्यात आला होता.

> वरील व्हिडिओमध्ये २.४५ मिनिटांवर पंतप्रधान मोदी हे रवींद्रनाथांचं छायाचित्र स्वीकारण्यासाठी उभे असल्याचं दिसत आहे.

> टागोरांचं छायाचित्र जेव्हा त्यांना पहिल्यांदा दिलं जातं, तेव्हा ते दाव्याप्रमाणे उलटं असतं.

> मात्र, पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावर असलेल्या एका व्यक्तीनं ही चूक त्वरीत सुधारली आणि ही प्रतिमा लगेचच सरळ करण्यात आली असं दिसत आहे.

निष्कर्ष: रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिमा पंतप्रधान मोदी यांनी हातात उलटी धरल्याची जी एक व्हिडिओ क्लिप आणि स्क्रीनशॉट सोशल मीडियावर फिरत आहे, तो पुरेशा संदर्भाविना आणि अर्धवट आहे. केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.

(डिस्क्लेमर: ही बातमी मुळात 'द क्विंट'नं प्रकाशित केली होती. ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा एक भाग म्हणून एचटी डिजिटल मीडियानं ती पुन्हा प्रकाशित केली आहे.)

IPL_Entry_Point