Video : कंपनीच्या रौप्य महोत्सवाचं सेलिब्रेशन करताना सीईओचा मृत्यू, पाहा हादरवून टाकणारं दृश्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Video : कंपनीच्या रौप्य महोत्सवाचं सेलिब्रेशन करताना सीईओचा मृत्यू, पाहा हादरवून टाकणारं दृश्य

Video : कंपनीच्या रौप्य महोत्सवाचं सेलिब्रेशन करताना सीईओचा मृत्यू, पाहा हादरवून टाकणारं दृश्य

Updated Jan 20, 2024 05:55 PM IST

Ramoji Film City accident News : कंपनीच्या रौप्य महोत्सवाचं सेलिब्रेशन करताना कंपनीचे सीईओ संजय शाह यांचं अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना हैदराबादमध्ये घडली आहे.

Vistex CEO Sanjay Shah death
Vistex CEO Sanjay Shah death

Vistex CEO Sanjay Shah Death News : हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं व यशस्वी वाटचालीचं सेलिब्रेशन करताना विसटेक्स एशिया कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघाताचा मनाला चटका लावणारा व्हिडिओ समोर आला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विसटेक्स कंपनीचा सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रम रामोजी फिल्मसिटीमध्ये (Ramoji Film City) आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला कंपनीचे अमेरिका स्थित सीईओ संजय शाह (५६ वर्षे) आणि कंपनीचे अध्यक्ष राजू दतला (५२ वर्षे) यांची खास उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार, संजय शाह व राजू दतला हे दोघे एका झुलत्या लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर उतरणार होते. क्रेनच्या सहाय्यानं हळूहळू हा पिंजरा स्टेजवर उतरवला जात होता. या पिंजऱ्याला सजवण्यात आलं होतं. त्याला रोषणाई करण्यात आली होती. कंपनीच्या कर्तृत्वाला साजेसा हा असा जल्लोष करण्याची योजना होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

Amazon: अयोध्यातील राम मंदिराच्या नावाखाली मिठाईची विक्री, अ‍ॅमेझॉनला नोटीस

शाह व दतला यांच्या एन्ट्रीसाठी असलेला पिंजरा ६ एमएम केबलच्या साहाय्यानं २५ फूट उंचीवर लटकवण्यात आला होता. बॉलिवूडच्या गाण्याच्या साथीनं कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाह व दतला यांना घेऊन पिंजरा खाली येत होता. हा पिंजरा हळूहळू खाली येत असताना अचानक केबल तुटली आणि पिंजऱ्यातून दोघेही स्टेजवर कोसळले.

बेसावध अवस्थेत कोसळलेले संजय शाह आणि राजू दतला हे जबर जखमी झाले. त्या दोघांनाही तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, संजय शाह यांचा जीव वाचू शकला नाही. राजू दातला यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. या अपघाताचा व त्यानंतर उडालेल्या गोंधळाचा व्हिडिओ मनाला चटका लावणारा आहे.

Mizoram News : म्यानमारचे शेकडो सैनिक भारतीय हद्दीत घुसले! काय आहे प्रकरण?

कंपनीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सुमारे ७०० कर्मचारी सहभागी झाले होते. कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून फिल्मसिटीच्या इव्हेंट मॅनेजरविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे १५ फूट उंचीवरून पडले होते आणि खालीचा मजला काँक्रिटचा होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर