Fact Check : बांगलादेशात आंदोलन करताना दिसला विराट कोहली? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्या सत्य-virat kohli lookalike spotted amid protesters in bangladesh video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : बांगलादेशात आंदोलन करताना दिसला विराट कोहली? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्या सत्य

Fact Check : बांगलादेशात आंदोलन करताना दिसला विराट कोहली? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्या सत्य

Aug 07, 2024 06:01 PM IST

Virat Kohli : बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादात विराट कोहली आंदोलन करताना दिसला, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बांगलादेश हिंसाचारात विराट कोहली आंदोलन करताना दिसला?
बांगलादेश हिंसाचारात विराट कोहली आंदोलन करताना दिसला?

Bangladesh Violence : बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. आंदोलकांना विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला आणि लाखो लोकांनी रस्त्यावर जोरदार निदर्शने केली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या निदर्शनांमध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली. या आंदोलनादरम्यान एक तरुण समोर आला, जो क्रिकेटपटू विराट कोहलीसारखा दिसत होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक जण या तरुणाला प्रथमदर्शनी विराट कोहली मानत आहेत. मात्र, खरे तर ही व्यक्ती विराट कोहली नसून त्याच्यासारखा दिसणारा तरुण आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लोक खूप शेअर करत आहेत. विराट कोहलीसारखा दिसणाऱ्या या तरुणाचे नाव समजू शकले नसले तरी व्हिडिओमध्ये  तो आंदोलनादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची टोपी घातलेला दिसत आहे. विराट आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून ही खेळतो.

हा व्हायरल व्हिडिओ झेरॉक्सी नावाच्या युजरने 'एक्स'वर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘किंग कोहली बांगलादेशमध्ये रस्त्यावर उतरून आनंद साजरा करतोय.’ अनेक लोक रस्त्यावर दिसत असून हे लोक शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याचा जल्लोष करत असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अडीच हजार लोकांनी लाइक केले आहे. 

यापूर्वी बांगलादेशात आरक्षणासंदर्भात मोठे आंदोलन सुरू झाले होते. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आणि देशभरात अनेक तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, सोमवारी अचानक परिस्थिती बिघडल्याने शेख हसीना यांना आपल्या बहिणीसह बांगलादेश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात असून येत्या काही दिवसांत त्या दुसऱ्या देशात आश्रय घेण्यासाठी जाऊ शकतात, असे मानले जात आहे. हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि बांगलादेश सोडल्यानंतर अनेक आंदोलक पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी घुसले आणि त्यांना जे काही मिळाले ते घेऊन गेले.

बांगलादेशच्या राजकीय संकटावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यापूर्वी पाकिस्तानने बांगलादेशच्या जनतेच्या पाठीशी उभे असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशी जनतेची लवचिकता आणि एकजूट त्यांना सौहार्दपूर्ण भविष्याकडे घेऊन जाईल, असा विश्वास पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे. विद्यार्थी नेते, राजकारणी, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख यांनी एकत्र येऊन संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. नोबेल पारितोषिक विजेते आणि अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी नव्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार होण्याचा विद्यार्थी आंदोलकांचा प्रस्ताव मान्य केला आहे.

विभाग