Viral News: भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये जास्त गर्दी ही एक सामान्य बाब आहे. एका भारतीय युट्यूबरने नुकताच भारतीय रेल्वे आणि चीनमधील गाड्यांच्या जनरल डब्यांची तुलना करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर हास्यास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा व्हिडिओ भारतीय युट्यूबर नोमॅड शुभमने रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओला जवळपास एक लाख व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. व्हिडिओमध्ये प्रवासी जमिनीवर बसलेले दिसत आहेत, अनेक जण टॉयलेट अडवून बसल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये युट्यूबरने चीनमधील एका ट्रेनच्या जनरल कोचची परिस्थिती दाखवली आहे. जमिनीवर बसलेल्या आरक्षण नसलेल्या प्रवाशांची दृश्येही त्यांनी टिपली. त्यातील एक प्रवासी सीटखाली झोपला होता. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एका युजरने म्हटले आहे की, ‘ही चीनची दुसरी बाजू आहे, जी भारतापेक्षा वाईट आहे.’ दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'या चिनी रेल्वेच्या जनरल डब्यातील गर्दी भारतीय गाड्यांपेक्षा अधिक आहे. फक्त या गाड्यांमध्ये एसी आणि स्वयंचलित दरवाजे आहेत.' तिसऱ्या युजरने अशी कमेंट केली आहे की, 'युट्यूबरला भारतीय जनरल क्लासमध्ये एवढ्या मोकळेपणाने फिरता आले नसते!' आणखी एका युजरने म्हटले आहे की, बघा चीनमधील गाड्या भारतीय गाड्यांपेक्षा किती स्वच्छ आहेत.' 'भारतात अशा स्वच्छ गाड्या आपण फक्त स्वप्नात पाहू शकतो. ही ट्रेन चीनमधील जुन्या गाड्यांपैकी एक आहे. तरीही त्यांचे इंटिरिअर आमच्या सर्वात महागड्या गाड्यांपेक्षा चांगले दिसते', असे एकाने म्हटले आहे.