Ahmedabad Metro News: दिल्ली मेट्रोत अश्लील घटना घडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अनेकदा व्हायरल झाले आहेत. नुकताच अहमदाबाद मेट्रोतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या व्हिडिओत एक तरुण चक्क महिला प्रवांशासमोर हस्तमैथुन करताना दिसत आहे. या घटनेनंतर तरुणाला एसआरपी जवानाच्या हाती देण्यात आले. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात की, मेट्रोत प्रवाशांची तुफान गर्दी आहे. एक महिला शेजारी बसली आहे. तरी सुद्ध तरूण हस्तमैथून करताना दिसत आहे. यानंतर महिलेला लाज वाटली आणि बाजूला सरकली. यावेळी इतर प्रवाशांनी त्याला अश्लील हावभाव करण्यापासून रोखले. मात्र, तरीही त्याने हस्तमैथून करणे थांबवले नाही. यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली. या घटनेवर स्पष्टीकरण देताना तरुणाने म्हटले आहे की, तो हस्तमैथून करत नसून मजकूर लिहित होता. या घटनेसंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गर्दीने भरलेल्या मेट्रो डब्यात महिला प्रवाशांसमोर अश्लील कृत्य करताना एका व्यक्तीला वस्त्रापूर पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी सकाळी कालुपूर स्थानकातून निघालेली आणि थलतेजच्या दिशेने जाणारी मेट्रो ट्रेन टीई०००८ मधील डब्बा एल ४ मध्ये घडली.एका प्रवाशाने या घटनेची व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग केली आणि थलतेज मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर एसआरपी चौकीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. तातडीने कारवाई करत मेट्रो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.
मेट्रो मीडिया कोऑर्डिनेटर अंकुर पाठक यांनी सांगितले की, ही घटना सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान घडली. प्रवाशाने माहिती दिल्यानंतर स्टेशनवरील आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आम्ही त्या व्यक्तीची ओळख पटवली. यानंतर त्याला पुढील तपासासाठी वस्त्रापूर पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण क्लिनर म्हणून काम करतो आणि कदाचित तो मानसिक आजाराने ग्रस्त असावा. चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांनी त्याच्या मानसिक आरोग्याविषयी चिंता निर्माण करणारे वर्तन पाहिले. सध्या आरोपीची ओळख उघड करण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी मेट्रो सुरक्षा प्रोटोकॉलचे पुनरावलोकन करत आहेत.