Viral Video : रील बनवायला आवडतं? मग 'अशी' चूक कधीच करू नका, नाहीतर जाल तुरुंगात-viral video youngsters on bike spray foam on elderly mans face riding cycle on busy road in jhansi ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : रील बनवायला आवडतं? मग 'अशी' चूक कधीच करू नका, नाहीतर जाल तुरुंगात

Viral Video : रील बनवायला आवडतं? मग 'अशी' चूक कधीच करू नका, नाहीतर जाल तुरुंगात

Sep 23, 2024 11:44 AM IST

Viral News: वृद्ध व्यक्तीला त्रास दिल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

रील बनवण्याआधी सावधान! 'अशी' चूक कधीच करू नका, नाहीतर जाल तुरुंगात
रील बनवण्याआधी सावधान! 'अशी' चूक कधीच करू नका, नाहीतर जाल तुरुंगात

Youngsters Spray Foam On Elderly Man: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील? याचा नेम नाही. आपला व्हिडिओ खूप लोकांनी पाहावा, यासाठी काहीजण सर्व मर्यादा ओलांडतात. मात्र, असे करणे एका तरुणाला चांगलेच महाग पडले आहे. संबंधित तरुण आपल्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्नो स्प्रे फवारतो आणि तेथून निघून जातो. मात्र,अशा कृत्यामुळे वृद्ध व्यक्तीचा अपघात किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला बेड्या ठोकल्या.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील झाशी येथील आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला चांगलाच धडा शिकवला असून कायदेशीर कारवाईही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आरोपी तुरुंगाच्या मागे आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो लंगडत आहे.

पोलिसांच्या कारवाईनंतर नेटकऱ्यांनी समाधानी प्रतिक्रिया दिल्या. एका व्यक्ती म्हटले आहे की, 'अतिशय कौतुकास्पद काम, खूप खूप धन्यवाद! अशा समाजकंटकांवर कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.' दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, 'या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई केल्याबद्दल पोलीस कौतुकास पात्र आहेत.'आणखी एका जणाने म्हटले आहे की,'पोलीस जेव्हा अशी तत्पर कारवाई करतात तेव्हा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो.' मला आशा आहे की तुम्ही सायकल चालवणाऱ्या वृद्धाला न्याय मिळाल्याची माहिती दिली असेल, नाहीतर त्याचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल, असेही एका व्यक्तीने म्हटले आहे. एका जणाने आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, रील बनवण्यासाठी इतरांना त्रास देणाऱ्यांची संख्या वाढत आहे, अशा लोकांना अटक करणे अत्यंत गरजेचे आहे.'

महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी रील बनवणाऱ्यांवर कारवाई केलेली ही पहिलीच वेळ नाही. स्टंटबाजी करणाऱ्या, इतरांना त्रास देऊन रील बनवणाऱ्या आणि आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांवरही यूपी पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा वेळी लोकांनी सावध राहून रील बनवण्यासाठी इतरांना त्रास देऊ नये, अन्यथा त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावा लागेल.

मुंबई: कपडे काढून रील बनवणाऱ्याला पोलिसांनी पकडले

रील्स बनवण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करत नाहीत, काही जण आपला जीव धोक्यात घालून तर काही इतरांसाठी धोकादायक ठरत आहेत. स्वत:ला 'लखनऊचा सलमान खान' म्हणवणाऱ्या आझम अन्सारीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबईत शर्टशिवाय फिरताना दिसत आहे. आझम अन्सारी मुंबईला गेले होता आणि त्याने सलमान खानला एकदा भेटण्याची विनंती केली होती, असे सांगण्यात येत आहे.सलमान खानने त्याची विनंती ऐकली नाही. परंतु, त्याला पोलिसांनी पकडले. तो मुंबईत कपडे काढून रील बनवत असल्याचा दावा केला जात आहे.

Whats_app_banner
विभाग