अनेक वेळा लोक सोशल मीडियावर शेअर काही करायला जातात अन् होते वेगळेच. त्यानंतर जे घडते ते फार गंमतीशीर असते. अशीच घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे. त्याने प्लान करून एक व्हिडिओ बनवला, तो आपल्या गर्लफ्रेंडला सरप्राइज देणार होता. मात्र असे काही झाले की तोच शॉक झाला. यामुळे त्याच्या पायाखालून जमीन सरकली व त्याचा चेहरा पाहण्यालायक होता.
इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ दक्षिण कोरियातील एका मॉलमधील आहे. त्यामध्ये एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १.३३ कोटी लोकांनी पाहिले असून ७६ हजार लोकांनी लाइक केले आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे तरुणाची रिएक्शन आहे.
तरुणाचा उद्देश्य काय होता?
व्हिडिओमध्ये सर्वात आधी हा व्यक्ती एका कोनमध्ये आईसक्रीममध्ये एक सोन्याची अंगठी ठेवतो व ती आईसक्रीम आपल्या गर्लफ्रेंडला देतो. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसते की, तरुणी संपूर्ण आईस्क्रिम खाऊन संपवले. त्यानंतर खरे सरप्राइज थोड्या वेळाने समोर येते.
तरुणी संपूर्ण आईसक्रीम चाटून पुसून खाते. तरुण वाट पाहात असतो की, त्याच्या प्रेयसीच्या तोंडात आताच अंगठी येईल, मग येईल. मात्र पाहता पाहता तरुणी आईसक्रीम संपवून टाकते. त्यानंतर तरुणाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. त्यानंतर व्हिडिओ संपतो. तरुणी निरागसपणे आईस्क्रीम खाल्ल्याचा आनंद व्यक्त करते.
हा व्हिडिओ लोकांना खूप पसंत पडत आहे. मात्र व्हिडिओवर खूप प्रश्न उठत आहेत. अखेर तरुणीला समजले कसे नाही, तिने अंगठी गिळली.. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरk_kangs_नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ १.३३ कोटी लोकांनी पाहिले आहे तर ७६ हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. कदाचित लोकांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा या कारणाने पाहिला असेल की, अखेर ही अंगठी गेली कुठे, हा व्हिडिओ नकली तर नसेल?
पत्नीने मत्सरातून तिच्या पतीचे लिंग वस्तऱ्याने कापून टाकले. लिंग कापल्यावर तिने ते टॉयलेटमध्ये फेकून दिले. या घटनेनंतर पत्नी थेट पोलिस ठाण्यात जाऊन तिने केलेल्या गुन्हाची तिने कबुली दिली. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर न्यायालयाने पत्नीला ५ वर्षांची शिक्षा दिली. मात्र, महिलेच्या पिडीत पतीने पत्नीला माफ केले असून तो पुन्हा तिच्यासोबत राहण्यास तयार झाला आहे. पत्नीच्या या कृत्यासाठी त्याने स्वत:लाच जबाबदार धरले आहे.
संबंधित बातम्या