Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

May 21, 2024 07:54 PM IST

Worms Found Inside Mango: व्हायरल व्हिडिओमध्ये आंबा खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे? हे सांगितले आहे.

आंब्यात अळ्या आढळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आंब्यात अळ्या आढळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mango Viral Video: सध्या आंब्याचा सीजन आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत. अनेक जण आंबा म्हटले की, अगदी ताव मारतात. आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक घटक असतात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यात एक महिला आंबा खाताना नेमकी कोणती काळजी घेतली पााहिजे? हे सांगताना दिसत आहे. ज्यामुळे आरोग्यावर दुष्पपरिणाम टाळता येऊ शकतात.

urvashiagarwal1 या इंन्स्टाग्राम आयडीवरून आंब्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत आंबा किंवा कोणतेही फळ खाण्यापूर्वी ४-५ तास पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. यामागचे कारणही त्यांनी सांगितले. या व्हिडिओमध्ये एक महिला दाखवते की, आंबा खाण्यापूर्वी तिने काही तास त्याला पाण्यात भिजवले. मात्र, यानंतर या अंब्यातून अळ्या बाहेर येऊ लागले. यावरून कळते की, हा आंबा खराब आहे. पाण्यात भिजवण्यापूर्वी हा आंबा एखाद्याने खाल्ला असता त्याला आरोग्याच्या संबंधित समस्या जाणवल्या असत्या, असेही सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ एक लाख लोकांनी पाहिला आहे. काही लोक या टिप्सला उपयुक्त म्हणत आहेत. तर, काही लोक आंबा आधीच सडल्याचे सांगत आहेत. फक्त व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी अशा युक्त्या सुचवण्यात आल्या आहेत, असेही अनेकजण बोलत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'आंबा खाण्यापूर्वी प्रत्येकजण तो चांगला आहे की नाही, हे तपासून पाहतात.' दुसरा युजर म्हणतोय, 'किती मूर्खपणा आहे, व्हिडिओमधील आंबा पूर्णपणे सडल्याचे दिसत आहे. फक्त व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवला जात आहे.' आणखी एका यूजरने असे म्हटले आहे की, 'हे अगदी खरे आहे, बाहेरून ताजे दिसणाऱ्या आंब्यातही किडे आढळू शकतात. मी ते अनुभवले आहे. कृपया कोणतेही फळ खाण्यापूर्वी नीट तपासा.'

आंबा भिजवण्याचे फायदे

- आंबा काही तास पाण्यात भिजवून ठेवल्यास शरीरात उष्णता निर्माण करणारे अतिरिक्त फायटिक अ‍ॅसिड बाहेर पडण्यास मदत होते.

- आंब्यात भरपूर फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे त्यांना भिजवल्याने त्यांची एकाग्रता कमी होते आणि ते 'नॅचरल फॅट बस्टर' म्हणून काम करतात,

- आंबा पाण्यात भिजवल्याने सर्व कीटकनाशके व रसायने नष्ट होतात. याशिवाय आंब्यावरील घाण, धूळ आणि माती पूर्णपणे काढून टाकली जाते. याच्या मदतीने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकता.

- भिजवण्यामुळे न पचलेल्या ऑलिगोसाकेराइड्समुळे होणारी पोटफुगीची पातळी कमी होण्यास मदत होते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर