मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटआउटसोबत महिलेचा अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटआउटसोबत महिलेचा अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 11, 2024 07:09 PM IST

Woman Vulgar Dance With PM Modi Cutout: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआउटसोबत अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video

PM Modi Cutout Viral Video: अनेकांना सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआउटसह अश्लील डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली माहिला नरेंद्र मोदींच्या कटआउटसोबत अश्लील डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.

केंद्र सरकारने देशभरातील रेल्वे स्थानके, रेशन दुकाने आणि इतर ठिकाणांसह विविध ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या चित्रांसह सेल्फी पॉइंट्स लावले आहेत. लोकांना पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्यासाठी तसेच त्यांनी लागू केलेल्या सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी सरकारने विविध ठिकाणी कटआउट्स लावले आहेत. याच कटआउट्ससोबत अश्लील डान्स करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या १९९३ चा सुपरहिट चित्रपट 'खलनायक'मधील 'आजा सजन आजा' या बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवातीला महिला महिला मोदींच्या कटआउटकडे धावत जाते आणि आणि मिठी मारते. त्यानंतर ती कटआउटसमोर अश्लील वाटणाऱ्या काही डान्स स्टेप्स करते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या १५ सेकंदाच्या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. हा एकप्रकारचा अश्लील व्हिडिओ आहे आणि सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी अशी कृत्ये करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

WhatsApp channel

विभाग