Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काही तरी नवीन पाहायला मिळते. परंतु, एका महिलेच्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. संबंधित महिलेच्या पतीचा ११ वर्षांपूर्वी निधन झाले. परंतु, तरीही गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. महिलेचे इतर कोणाशीही संबंध नाही. या महिलेच्या पतीने स्वप्नात येऊन तिला गरोदर केल्याचे तिने दावा केला, जो अत्यंत धक्कादायक आहे. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले. लोकांनी महिलेची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली.
पतीच्या मृत्युनंतर ही महिला कशी गर्भवती झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या महिलेचे गावातील कोणत्या पुरुषाशी संबंध असल्याची अनेकांनी संशय व्यक्त केला जात आहे. या महिलेचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असावे, ती महिला खोटी बोलत आहे, असा आरोप अनेकजण करत आहेत. आरोपांना उत्तर देताना महिलेने दावा केला की, तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला असला तरी तो अजूनही तिच्यासोबत राहतो. तो तिच्या स्वप्नात येतो. हे दोघे जण स्वप्नात भांडतात आणि एकत्र झोपतात. यामुळे ती गरोदर राहिल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, असेही या महिलेने म्हटले आहे.
महिलेने केलेला दावा वैज्ञानिकदृष्ट्या शक्य नाही. स्त्रीला स्वप्नात किंवा चमत्कारिक मार्गाने गर्भवती होणे शक्य नाही. एका यूजरने महिलेच्या व्हिडीओवर कमेंट करत तिची आणि तिच्या मुलाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून मुलाचे वडील ओळखता येतील. एका युजरने ही घटना दुःस्वप्न असल्यासारखी वाटते कमेंट केली. एका युजरने कमेंट केली की, ती महिला मूर्ख आहे आणि तिला संपूर्ण जग मूर्ख वाटते. ही महिला लोकांना फसवणूक करत आहे. या गोष्टींमध्ये तथ्थ नाही.
ही पहिली घटना नाही. आजकाल स्त्रिया पतीच्या मृत्यूनंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मुलाला जन्म देऊ शकतात. परंतु, अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये मेरी कुहलमन नावाच्या महिलेच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूच्या काही तास आधी ती गरोदर राहिली आणि सात महिन्यांनी तिला मुलगा झाला. याशिवाय, एका तज्ज्ञाने नोंदवलेली माहिती अशी आहे की, जर पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याचे शुक्राणू साठवले गेले तर, त्याची पत्नी गर्भवती होऊ शकते. ते शुक्राणू देखील दान केले जाऊ शकतात.
संबंधित बातम्या