Viral Video: डोक्यावर तलवार ठेवून तरुणीचा बेली डान्स, व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: डोक्यावर तलवार ठेवून तरुणीचा बेली डान्स, व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स!

Viral Video: डोक्यावर तलवार ठेवून तरुणीचा बेली डान्स, व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स!

Oct 28, 2024 02:47 PM IST

Woman Belly Dance Viral Video: डोक्यावर तलवार ठेवून बेली डान्स करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

व्हायरल व्हिडिओ: डोक्यावर तलवार ठेऊन तरुणीचा बेली डान्स
व्हायरल व्हिडिओ: डोक्यावर तलवार ठेऊन तरुणीचा बेली डान्स

Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी वेगळे पाहायला मिळत असते. असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. या व्हिडिओ एक तरुणी चक्क डोक्यावर तलवार ठेवून डान्स करताना दिसत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून बऱ्याच लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे,

व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुणी ‘नामक इश्क का’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र, तिचा डान्स इतरांपेक्षा वेगळा आहे. या व्हिडिओत तरुणी आपल्या डोक्यावर तलवार ठेवून बेली डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स आणि हावभाव पाहून ती यात पारंगत असल्यासारखे वाटते.

व्हिडीओच्या सुरुवातीला तरुणी आपल्या डोक्यावर तलवार ठेवून बॅलन्स करताना दिसली आणि त्यानंतर तिने ओंकारा चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर बेली डान्स करून सर्वांना चकित केले. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, हा व्हिडिओ २८६७ प्रयत्नांनंतर बनवण्यात आला असून ही तलवारही दहा वर्षांहून जुनी आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी या तरुणीच्या टॅलेंटचे कौतुक केले आहे. तर, काही जण तिची थट्टा उडवत आहेत. या व्हिडिओच्या कॅमेंटमध्ये एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'खरे तर याला टॅलेंट म्हणतात.' दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'हा व्हिडिओ अजिबात खरा वाटत नाही. हा व्हिडिओ एआयद्वारे तयार करण्यात आल्याचे दिसते.' तिसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की,'डान्स चांगला होता. पण असे करण्याची काय गरज होती.' आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'एक्सप्रेशन आणि बॅलन्स हे सगळेच अप्रतिम आहे'. तर,एका व्यक्तीने तरुणीला तलवारशी न खेळण्याचा सल्ला दिला.

अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे ट्रान्सजेंडरची हत्या

उत्तर प्रदेशच्या अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रान्सजेंडरची हत्या केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या रागातून आरोपींनी गळफास लावून त्याची हत्या केली. हत्येला आत्महत्येचे वळण देण्यासाठी आरोपींनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह गावातील स्मशानभूमीत झाडाला लटकला. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय आल्याने त्यांनी पुढील तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर