Viral News: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे कधी हसवणारे असतात कधी रडवणारे तर, कधी थरारक असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेच्या डोक्यावर टेरेसवरुन चक्क पाण्याची मोठी टाकी पडली आहे. सुदैवाने, या घटनेत महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कॉलनीमधील आहे, जिथे एक महिला एका घरातून दुसऱ्या घरात जाताना दिसत आहे. यावेळी ती काहीतरी खात आहे. अचानक टेरेसवरून भलीमोठी पाण्याची टाकी महिलेच्या डोक्यात पडते.हे पाहिल्यानंतर अनेकांना असे वाटले की, महिलेला गंभीर दुखापत झाली. परंतु, पुढे असे काही दिसले की, पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला.
महिलेला वाचवण्यासाठी एक व्यक्ती तिथे धावत आला. पण महिला स्वत:च टाकीबाहेर डोकावू लागली. सुरुवातीला तिला काय झाले, हे समजायला वेळ लागला. त्यानंतर आपल्या डोक्यात पाण्याची टाकी पडल्याचे तिच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, अशा परिस्थितीतही महिला काहीतरी खात होती. या घटनेत महिलेला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर मोठ्या संख्येने लोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, 'ही अत्यंत गंभीर घटना आहे. परंतु, मला हसूही आवरता येत नाही.' दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, 'पाण्याच्या टाकीत अडकल्यानंतरही महिला सफरचंद खात होती, ही सर्वात मजेदार गोष्ट आहे.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, 'अशा घटनेवर हसू नये. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आवरता येणार नाही.' आणखी एका युजरने म्हटले आहे की,'जर कोणी मुद्दाम पाण्याची टाकी फेकली असेल तर, तो ऑलिम्पिकला जाण्यास पात्र आहे.' एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'या काकी तर सुपर मॉम निघाल्या, आता शेजाऱ्यांची काही खैर नाही.'
संबंधित बातम्या